शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

पाऊस, धुक्यामध्ये नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेकचा थरार; परभणीच्या गिर्यारोहकांची मोहीम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:45 IST

सह्याद्रीत भर पावसांत तीन दिवसांत नाणेघाट ते भीमाशंकर ७५ किमीचा ट्रेक यशस्वी आढळले ऐतिहासिक शिलालेख

परभणी : मुसळधार पावसात धुक्याने आच्छादलेला सह्याद्री, तसेच चढाईस कठीण असलेला नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेक परभणीच्या स्वराज्य ट्रेकर्सच्या १७ सदस्यांनी केवळ तीन दिवसांत यशस्वीपणे पार केला. या मोहिमेची एकूण दुर्मीळ आणि साहसी ७५ किलोमीटरची मार्गदर्शक प्रवास होता.

या मोहिमेची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील वाल्लीवरे गावातून शुक्रवारी झाली. सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या नाणेघाटाची चढाई गिर्यारोहकांनी सात तासांत, जोरदार पावसात पार केली. मार्गातील गुहांमध्ये आजही ब्राह्मी लिपीत लिहिलेला प्राकृत भाषेतील शिलालेख दिसतो, तर टोल वसुलीचे प्रतीक असलेला रांजण देखील आहेत. यामुळे गिर्यारोहकांना ऐतिहासिक ठसा अनुभवता आला. त्यानंतर त्यांनी जीवधन किल्ला सर केला. पावसाळ्यात अधिकच कठीण होणाऱ्या नाळेवाटेने चढाई करताना, पाय घसरणारे दगड, झाडाझुडपांमधून जाणारी वाट आणि धारदार पाण्याच्या धारांना तोंड देत गिर्यारोहकांनी साहसाचे उत्तम दर्शन घडवले.

२६ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबोली गावातून ढाकोबा व दुर्ग किल्ल्याच्या दिशेने चढाई सुरू झाली. अनेक धबधबे, घनदाट जंगल आणि चिखलाने भरलेले मार्ग पार करत गिर्यारोहकांनी दुर्गम वाटा सहज पार केल्या. २७ जुलै रोजी आहुपे गावातून सुरू झालेला शेवटचा टप्पा अनेक डोंगररांगा पार करत भीमाशंकर गावी समाप्त झाला. संपूर्ण मोहिमेत गिर्यारोहकांनी निसर्गातील अनेक आव्हानांना तोंड देत, कठीण चढाई व दाट जंगलातील मार्गावर मात करून धाडसी साहस सिद्ध केले.

यांनी नोंदविला सहभागही मोहीम नाशिक येथील जॉकी सोळुंके व किशन मोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर नेतृत्व स्वराज्य ट्रेकर्सचे माधव यादव, गुलाब गरूड आणि रणजित कारेगावकर यांनी सांभाळले. मोहिमेत प्रा. डॉ. जयंत बोबडे, डॉ. रमेश शिंदे, ॲड. सोमनाथ व्यवहारे, प्रा. राम कराळे, प्रसाद गरूड, विष्णू मेहत्रे, भागवत मोरे, शंकर गायकवाड, गजानन पवार, गणेश यादव, प्रकाश राठोड, गजानन तुरे, हरिओम पवार, ऋषिकेश मुळे यांचा सहभाग होता.

दुर्गम किल्ल्यांचे दर्शनस्वराज्य ट्रेकर्स संस्थेमार्फत दरवर्षी अशा साहसी मोहिमांचे आयोजन केले जाते. यामार्फत सह्याद्रीतील दुर्गम किल्ल्यांचे दर्शन घडवले जाते, तसेच गिर्यारोहणाच्या माध्यमातून इतिहासाची ओळख, शारीरिक क्षमतेची चाचणी आणि मनोबल वृद्धी यांचा संगम साधला जातो. अशा मोहिमांमुळे तरुण पिढीत देशाच्या दुर्गवारशाचा अभिमान जागविला जात आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीBhimashankarभीमाशंकर