शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक रुग्ण पतीचे धक्कादायक कृत्य; झोपेतील पत्नीचा बेल्टने गळा आवळून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 18:05 IST

जिंतूर शहरातील घटना; किरकोळ कारणावरुन झाले कडाक्याचे भांडण

जिंतूर : रडणाऱ्या मुलास घेण्यास नवऱ्याने नकार दिल्यामुळे पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. भांडणाचा राग मनात धरून पतीने कमरेच्या बेल्टने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी जिंतूर शहरातील रमाई नगरात घडली.

शहरातील रमाई नगरात राहणारे राजू अवचार व मयत सुनिता राजू अवचार यांच्यामध्ये १३ मार्च रोजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजे दरम्यान नवरा-बायकोमध्ये वाद झाला. रडणाऱ्या मुलास घ्या, म्हणून पत्नीने राजू यास सांगितले असता आरोपी व त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने कमरेला लावलेला बेल्ट काढून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून होती. सकाळी हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, उपनिरीक्षक साहेबराव चौरे, कॉ. लीला जोगदड, बाळकृष्ण कांबळे, उमेश चव्हाण, गजानन बंदुके आदींच्या पथकाने धाव घेत घटनास्थळावरून बेशुद्ध अवस्थेत विवाहित महिलेस नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. देवीदास गरड यांनी तपासून मृत घोषित केले.

आरोपी होता मनोरुग्नदरम्यान, राजू आवचार हा मनोरुग्न होता त्याच्यावर औरंगाबाद येथे काही दिवस उपचार करण्यात आले होते. नवरा- बायको विभक्त राहत होते. परंतु, घरी लग्न असल्याचे कारण सांगून राजू आवचार याने काही दिवसापूर्वीच पत्नीला जिंतूर येथे आणले होते, या संदर्भातली फिर्याद संतोष नितनवरे यांनी जिंतूर पोलिसात दिली. त्यावरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सदरील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादparabhaniपरभणी