शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास; जीवनाचा अधुरा प्रवास; संविधानप्रेमी सोमनाथची अधुरी कहानी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:14 IST

विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला.

परभणी : घरची परिस्थिती जेमतेम, यात वडिलांचे छत्र हरवलेले आणि आईसोबत दोन भावांचा आधार असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा विधिज्ञ होण्यासाठी संघर्षमय प्रवास सुरू होता. यासाठी तो पुणे येथून परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. परभणीतील शंकर नगर भागात किरायाच्या रूममध्ये मित्रांसोबत वास्तव्यास होता. एलएल.बी. तृतीय वर्षाची परीक्षा तो देणार होता. या परीक्षेच्या आधीच त्याच्या आयुष्यात कलाटणीचा प्रसंग आला. त्यालाही तो धीराने सामोरे गेला. मात्र, विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला.

परभणीत रविवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (वय ३६) हा मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी. त्याला आई आणि दोन लहान भाऊ असून, दोन्हीही भाऊ उच्चशिक्षित आहेत. सोमनाथ हा अविवाहित होता. घरच्या परिस्थितीमुळे मिळेल ते काम करण्यासाठी आई पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे राहायच्या. काही काळ तेथे सोमनाथ यानेही वास्तव्य केले. परभणीमध्ये शिवाजी विधि महाविद्यालयात तो एलएल.बी. तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तृतीय वर्षाची परीक्षासुद्धा या आठवड्यातच सुरू होणार होती. त्यासाठी तो मित्रांसोबत शंकर नगर भागात वास्तव्यास होता. बुधवारी शहरातील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी गुन्ह्यात ताब्यात घेतले. यानंतर अवघ्या चार दिवसांत त्याचा मृत्यू झाला. यामुळे अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणात योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोमवारी राज्यात हा बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला.

समाज माध्यमावरही भावनिक पोस्टसंविधानप्रेमी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी तसेच कायद्याविषयी त्याला प्रचंड आवड होती. शहरात कुठेही संविधानप्रेमी संघटना, संविधानाच्या विषयी असलेल्या विविध कार्यक्रमांत तो सहभागी व्हायचा. याविषयीचे त्याचे प्रेम समाज माध्यमावर अनेकांनी भावनिक पोस्टद्वारे व्यक्त केले. मित्र असो की वास्तव्यास असलेल्या भागाचे रहिवासी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनीसुद्धा तो अगदी मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा हुशार विद्यार्थी असल्याची भावना बोलून दाखविली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी