शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली, सहा एकरवरील ऊस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:53 IST

शेतकऱ्यांचा सहा एकर ऊस जळून खाक; पूर्णा तालुक्यातील निळा येथील घटना

- विनायक देसाईपूर्णा : तालुक्यातील निळा येथे शॉटसर्किटने आग लागून शेतकऱ्यांच्या सहा एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते १०.३० च्या सूमारास घडली.

निळा शिवार गट क्रमांक ९६ मध्ये शेतकरी ज्ञानोबा सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, ओंकारेश्वर सूर्यवंशी यांनी उसाची लागवड केली होती. शेतामधून विद्युत पुरवठा करणारी मुख्य विद्युत वाहिनी जाते. आज सकाळी उसाच्या शेतामध्ये विद्युत तारांचे एकमेकाला घर्षण होऊन त्यातून ठिणग्या खाली पडल्याने उसाच्या पाचटीने पेट घेतला. काही क्षणातच आगीने सहा एकरवरील उसाला कवेत घेतले. आग नियंत्रणात न आल्याने ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. आगीची घटना सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान घडली. 

यानंतर शेतकरी, अर्जदाराचे चुलत भाऊ, नातेवाईक यांनी आग लागल्याची माहिती विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यास दिली. यानंतर विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर उसामध्ये एक बांध होता. त्या बांधाजवळील ऊस क्षेत्र तोडून आग नियंत्रणात आणण्यात आली. अन्यथा त्या क्षेत्रातील दुसरे अंदाजे सहा ते दहा एकर क्षेत्र बाधित होऊन खाक झाले असते, असे संबंधित शेतकऱ्यांनी माहिती दिली.

महावितरणला निवेदन सादर करणारविद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. यापूर्वी सुद्धा दोन वर्षांपूर्वी माझा ऊस जळून नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी सुद्धा तक्रार दिली होती. तारा एकमेकांना घासल्याने ठिणग्या उसात पडून ऊस पेटला. मोठ्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आल्यामुळे बाकीचे क्षेत्र वाचले अन्यथा पूर्ण उसाचे क्षेत्र जळून खाक झाले असते. याबाबत महावितरणला निवेदन सादर करुन विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करणार आहे.- ज्ञानोबा गणपती सूर्यवंशी, शेतकरी.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी