शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चालकानेच साधला डाव; साथीदारांच्या मदतीने मुनिमाची कार रस्त्यात अडवून लुटले ४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:19 IST

चालकाने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून निर्जन ठिकाणी कार अडवून लुटली रक्कम

सोनपेठ (परभणी): व्यापाऱ्याची उधारीची रक्कम वसुली करून परतणाऱ्या मुनीम आणि वॉचमन यांची कार रस्त्यात दुचाकी आडवी लावून थांबवत चार लाखांची रक्कम लुटल्याची घटना 26 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला असून मुनीम आणि वॉचमन ज्या कारमध्ये होते त्याच्या चालकानेच हा लुटीचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे. 

परळी येथील व्यापारी विष्णू देवसटवार यांचा मुनीम व वॉचमन हे गंगाखेड येथे कारने ( एम एच 44 झेड 6544 ) वसुलीसाठी आले होते. चार लाखांची रक्कम वसूल करून गंगाखेडहून मुनीम वॉचमनसह परळीकडे परतत होते. दरम्यान, गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटी येथे कारच्या समोर अचानक एक दुचाकी आडवी लावण्यात आली. यानंतर दुचाकीवरील दोघांनी गाडीतील मुनीम व वॉचमनला मारहाण केली. त्यांच्याजवळील ४ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन दोघे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी विष्णू देवसटवार यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात 27 जुलै रोजी अज्ञात दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करत कारचा चालक मयुर मोरे ( रा. मुंगी ता. परळी ) यास  चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत मोरेने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून लुटलेले ४ लाख रुपये आरोपी सचिन सोळंके याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहेत. आणखी एक आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हात वापरलेले वाहन ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सपोनी संदिप बोरकर, एएसआय कुलकर्णी,  कुंडलीक वंजारे, शिवाजी जाधव आदीनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी