शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कौटुंबिक बदनामीपेक्षा 'त्या' तिघांनी मृत्यूला कवटाळले ! गंगाखेड हादरवणाऱ्या घटनेचे गूढ उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:43 IST

आरोपी पोलिसांच्या ताब्यात; वाचा घटनेची पार्श्वभूमी आणि कसा पकडला आरोपी

गंगाखेड : एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यभरात गाजले होते. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी शिक्षकी कुटुंबाला सहन न झाल्याने ही आत्महत्या घडल्याचे मूळ कारण आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याचे यातून पुढे आले आहे. यात आरोपी युवकास गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना व मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेड हादरले होते. या घटनासंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. याप्रकरणी मयताचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे (रा. किन्नी (कदू), ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा. परभणी) या युवकाविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुरनं ७६४/२०२४ कलम १०८ भा.न्या.सं.अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सीडीआर, आयओंचे तपास कौशल्य, आरोपी निष्पन्नया घटनेचा तपास करणे पोलिसांना आव्हान होते. मात्र, तपास अधिकारी सपोनि. सुनील इंगळे यांच्या तपास कौशल्यास यश आले. आरोपी युवकाच्या मोबाइल सीडीआरवरून तपास अधिकाऱ्यांना संशय बळावला. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस व कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबर रात्री ११:३० वाजता गंगाखेड ठाणे डायरीत ५३/२०२४ नुसार नोंद घेण्यात आली. गुरुवारी दुपारी आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

घटनेची पूर्वपार्श्वभूमीफिर्यादीच्या तक्रारीनुसार घटनेची पूर्वपार्श्वभूमी पुढीलप्रमाणे : या प्रकरणातील आरोपीने फिर्यादीची मयत पुतणीसोबत लग्न करून द्या, नाही तर तिच्यासोबत असलेले काढलेले व्हिडीओ व फोटो हे व्हायरल करून तुम्हा सर्वांची बदनामी करेल, तसेच संबंधित मुलीसोबतचे आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल केले. त्यामुळे होत असलेल्या बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादीचा भाऊ मसनाजी तुडमे, रंजना तुडमे व अंजली तुडमे तिघांनी एकत्रित रेल्वे रुळाखाली सामूहिक आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे करीत आहेत.

कुटुंबात संवाद हवाआज-काल मोबाइलमध्ये समाजमाध्यमांचे विविध प्रकार वाढले आहेत. ज्यात युवा पिढी गुंतून जात आहे. पालकांनी आपला पाल्य कुठल्या कौटुंबिक सामाजिक परिस्थितीत वावरत आहे. यात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चुकून एखादा प्रकार घडल्यास पालक- पाल्य यांच्या संवादातून अनेक प्रश्न कुटुंबाच्या चार भिंतीत सहज सुटू शकतात. ज्यातून दुर्घटना टळते.- डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकDeathमृत्यू