कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शेतकरी व कामगारविरोधी कायदे रद्द करावे, सर्व जनतेचे १०० टक्के लसीकरण शासनाच्या वतीने करावे, निष्काळजीपणामुळे झालेल्या रुग्ण मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात यावा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांना पीकविमा भरपाई द्यावी, सर्व जॉबकार्डधारक मजुरांना ७ हजार ५०० रुपये प्रतिमाह कोविड लॉकडाऊन मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या निषेधार्थ २६ मे हा काळा दिवस पाळण्यात आला. यानिमित्त घरावर काळे झेंडे लावणे, काळ्या फिती लावणे, निवडक ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, माधुरी क्षीरसागर, ज्ञानेश्वर काळे, श्रीनिवास वाकणकर, बाळासाहेब हरकळ, नवनाथ कोल्हे, शिवाजी कदम, तुषार पालकर, आसाराम जाधव, आसाराम बुधवंत, ओंकार पवार, सरपंच प्रकाश गोरे, अनिल पंडित आदींनी सहभाग नोंदविला.
परभणीत पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST