शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कंठेश्वर बंधाऱ्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष; वेळोवेळी सुधारित किंमती वाढूनही होईना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 8:47 PM

कंठेश्वर निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे़

पूर्णा (परभणी ) : तालुक्यातील कंठेश्वर निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे़ याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना निवेदन देऊन, आंदोलन करूनही या कामास गती मिळाली नाही़ अखेर या परिसरातील ग्रामस्थांनी हा प्रश्न लोकशाही दिनात मांडला़ त्यानंतर तालुका, जिल्हाधिकारी यांच्या  निर्णयानंतर आता या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात अर्ज करण्यात आला.

तालुक्यातील कंठेश्वर, महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले आहे़ पूर्णा नदीवर २००९ साली कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली़ या बंधाऱ्याच्या कामासाठी २००५-०६ मध्ये २ कोटी १० लाख ६३ हजार ९२३ रुपये या सुधारित किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली़ राज्यस्तरीय सल्लागार समितीने १५ डिसेंबर २०१५ रोजी ६६ व्या बैठकीत सुधारित प्रशासकीय अहवाल अंतीम करून महामंडळास सादर केला़ त्यानंतर बांधकामाची सुधारित किंमत ३ कोटी ५५ लाख ७४ हजार ८०० पर्यंत गेली आहे़ या बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडून वेळोवेळी सुधारित किंमत वाढूनही हे काम रखडले आहे़

बंधारा पूर्ण झाल्यास पूर्णा तालुक्यातील ९०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ यामध्ये निळा येथील ४०० हेक्टर, कळगाव १०० हेक्टर, महागाव १०० हेक्टर, कंठेश्वर १०० हेक्टर, आजदापूर १०० हेक्टर तर कानखेड या परिसरातील काही भाग सिंचनाखाली येणार आहे़ तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे़ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या अपूर्ण कामाबाबत परिसरातील नागरिकांचा मागील चार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे़ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता़ २७ मार्च रोजी कार्यकारी अभियंता यांनी या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून, लोकशाही दिनानंतर २४ मीटर स्लॅबचे काम झाल्याची लेखी माहिती जिल्हाधिकारी यांना कळविली होती़ परंतु, त्यानंतर कामाची  गती पूर्णपणे थांबली़ आता बंधाऱ्याचे हे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या लोकशाही दिनात दाखल करण्यात आले असून, २ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यात आला आहे़ अर्जावर संजय  गंगाधर कदम, दिगंबर सूर्यवंशी, लक्ष्मण वैद्य, पांडूरंग कदम, ओंकार वसमतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ 

निधी मंजूर काम ठप्पपूर्णा तालुक्यातील कंठेश्वर-निळा या परिसरातील नदीपात्रातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला़ परंतु, निधी मंजूर होवूनही कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे हे काम अनेक वर्षांपासून पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे याकडे विभागीय आयुक्तांनी लक्ष देऊन काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी