शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कानसूर येथून वाहून आलेल्या वाळूने तारुगव्हान ठेक्यावर तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:45 IST

गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी ८ दिवसांपासून येथील वाळू ठेका बंद पाडला आहे. 

तालुक्यातील तारुगव्हाण येथील नदी पात्रातून ३ हजार ५००  ब्रास वाळू उपसण्यासाठी लिलाव झालेला आहे. यातून मागील महिनाभरातून बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे येथील पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे बाजूच्या कानसूर पात्रात ग्रामस्थांनी वाळूचा लिलाव करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे या भागात अद्याप चांगला पाणीसाठा आहे. येथे पाणीटंचाई जाणवत नाही.

मागील आठवड्यात जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे कानसूर पात्रातील वाळू वाहून तारूगव्हाणच्या पात्रात आली. लागलीच येथील ठेकेदाराने याचा उपसा सुरु केला. मात्र, या ठेकेदाराने आधीच वाळूचा अमाप उपसा केला असल्याने कानसूर ग्रामस्थांनी याला विरोध केला. दरम्यान, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित ठेकेदार यांनी या ठेक्यावर जाऊन पाहणी.मात्र, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणचा वाळू उपसा करू दिला जाणार नाही अशी ठोक भूमिका कानसुर ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे मागील आठ दिवसांपासून येथील ठेका बंद आहे.  वाळूचा एक कणही पात्रातून उचलू देणार नाहीत या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असून त्यांची एकजूट आहे. 

टॅग्स :sandवाळूriverनदीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी