शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स विमा कंपनीविरोधात परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:35 IST

पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़

ठळक मुद्देरिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ अशी मुख्य मागणी

परभणी : पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ या आंदोलनामुळे ठिक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती़ 

रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे़ तेव्हा रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ या खरीप हंगामात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर निश्चित करावी, विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी, दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवीन नियम रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे कॉ़ राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ 

परभणी शहरातील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला़ गंगाखेड तालुक्यात गंगाखेड, राणीसावरगाव, पालम,  दैठणा, परभणी तालुक्यात खानापूर, झिरोफाटा, झरी, पाथरी, सेलू आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ठिक ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ प्रशासनाची धावपळ झाली़ 

खानापूर फाटा येथे रास्ता रोको

खानापूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ पीक विम्याच्या पैशाबरोबरच तुरीचा प्रश्नही या आंदोलनातून मांडण्यात आला़ १५ मे पासून तूर खरेदी बंद पडली आहे़ आॅनलाईन नोंदणी केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक असून, ही तूर खरेदी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, शेख जाफर, दिगंबर पवार, गोपाळ लोंढे, अमोल जवंजाळ, बालाजी मोहिते, दिनकर गरुड, रामकिशन गरुड, गजानन गरुड, शिवाजी आवचार, संतोष थोरात, नागनाथ देशमुख, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, योगेश दराडे, रमेश दुधाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी