शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:57 IST

जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या २ लाख शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

परभणी :  जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या २ लाख शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

पीक विमा प्रकरणामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी २५ जूनपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत गुरुवारी बाजारपेठ बंद ठेवली होती. तर आज विविध पक्ष संघटनांच्या वतीने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यातील पेडगाव फाटा येथे सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच परभणी- गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी परभणी- गंगाखेड रस्त्यावर बैलगाड्या आणून उभ्या केल्या होत्या. पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे परभणी- वसमत या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले.

सोनपेठ येथील शिवाजी चौकामध्ये तर मानवत येथील महाराणा प्रताप चौकामध्ये सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. गंगाखेड शहराील परळी रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी