शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील पाईप फोडणाऱ्या हायवावर दगडफेक; पाथरीत वाळूमाफिया अन् ग्रामस्थांत मध्यरात्री राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:28 IST

पाथरी तालुक्यात माफियांचा हैदोस :संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या ट्रकच्या काचा फोडल्या. यानंतर हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आला.

पाथरी (जि.परभणी) : गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने तुरा गावाजवळील शेतकऱ्याची पाईपलाईन फुटल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाळूच्या हायवाची काच फोडली. त्यानंतर माफियांच्या मदतीस आलेल्या इतर काही जणांच्या दुचाकीही फोडल्याची घटना ९ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. हे दोन्ही हायवा जप्त केले असून, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाथरी तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन केले जाते. वाळू उत्खनन सुरू असताना प्रशासन मात्र किरकोळ कारवाई करून मलमपट्टी केल्याचे दाखविते. यामुळे वाळूमाफियांचे धाडस चांगलेच वाढले असून, यंत्रणेला ते जुमानत नाहीत. त्यामुळे ही मंडळी सामान्यांनाही त्रास देत आहे. असाच प्रकार ९ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास तुरा येथे घडला. तुरा गावापासून कॅनॉल मार्गे गुंजकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर माफियांकडून वाळू वाहतुकीसाठी केला जात आहे. याच रस्त्यावर वाळूच्या हायवाने एका शेतकऱ्याची पाईपलाईन फुटली. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी गाव परिसरात वाळूचा हायवा अडवला. भरपाईची मागणी केली. मात्र माफियांनी अरेरावी केली. पाथरीतून काही जणांना बोलावून शेतकऱ्यालाच मारहाण केली.

त्यानंतर अक्षरशः गाव एकवटले. त्यांनी रस्त्यावर असलेल्या हायवाच्या काचा फोडल्या. गावापुढे माफिया व त्यांनी बोलावलेल्या गुंडांचेही काही चालले नाही. हायवा जागीच सोडून अक्षरश: पळून जाण्यात धन्यता मानावी लागली. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविली. घटनास्थळी अधिकारी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी माफियांच्या मुजोरीचा पाढा वाचला. तर यातून होणारा त्रास व नुकसानीची माहिती दिली. शिवाय जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत वाहन येथून हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या वाहनावर कारवाईचे आश्वासन दिले. हा प्रकार रात्री ११ वाजता सुरू होऊन पहाटे उशिरापर्यंत सुरूच होता.

दोन वाहनांवर पोलिसात गुन्हा दाखलया घटनेनंतर पाथरी पोलिसांनी दोन हायवा ट्रकवर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या रेट्यापुढे ही कारवाई करणे भाग पडले.

तडीपारीचे दिले आश्वासनअवैध वाळू वाहतुकीच्या वाहनावर आजपर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र एकाही वाळूमाफियावर तडीपारीची कारवाई झाली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मात्र आता या प्रकरणात तडीपारीची कारवाई करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यापुढे अवैध वाहतूक बंद करावीगुंज, गोंडगाव या भागातून येणारी अवैध वाहतुकीची वाहने तुरा गावातून येतात. गावात या रस्त्यावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. दिवसाढवळ्या वाहने वेगाने जात असल्याने येथील शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या भागातून अवैध वाहतुकीची वाहने कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी