शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चोरून वापरली वीज; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 16:25 IST

जिंतूर शहरातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित  (पीडी) केलेल्या ग्राहकांची तपासणी केली असता, त्या ग्राहकांद्वारे अनधिकृतपणे वीज वापर केला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

परभणी : थकबाकी न भरल्याने वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला असतानाही चोरून वीज वापरणाऱ्या चार  ग्राहकांवर विद्युत कायद्यान्वये कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांघिक कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाईत ही बाब निदर्शनास आली असून अधिकृतपणेच वीज वापरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

जिंतूर शहरातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित  (पीडी) केलेल्या ग्राहकांची तपासणी केली असता, त्या ग्राहकांद्वारे अनधिकृतपणे वीज वापर केला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत जिंतूरचे उपकार्यकारी अभियंता आर. आर. मेश्राम आणि  शहर शाखेचे सहायक अभियंता ए. डब्लू. कामडी यांच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी बामणी प्लॉटवरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासमोरील भागात असणाऱ्या अनधिकृतपणे वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची तपासणी केली. यामध्ये चार ग्राहकांचे वीज मीटर बिल थकबाकी असल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. 

मीटर व वायर काढून आणल्यानंतर या ग्राहकांद्वारे आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापर केला जात होता. या ठिकाणचे घटनास्थळ पंचनामा करून वीज कायदा २००३ च्यानुसार ४ जणांवर एकूण १,१३३ युनिटची वीज चोरी केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

प्रत्येकाला भरावे लागणार २६ हजार ८३६ रुपयेया कारवाईत सय्यद फिरोज तब्बू यांना २५९ युनिटच्या वीज चोरीचे ४ हजार ३२३ एवढे वीज बिल दंड म्हणून आकारण्यात आले, तसेच ताहेर खान जाफर खान पठाण यांना ३३४ युनिटच्या वीज चोरीचे ५ हजार ४४६ एवढे वीज बिल दंड म्हणून देण्यात आले. अब्दुल रेहमान मोबीन यांना ३२४ युनिटच्या वीज चोरीचे ११४५ एवढे वीज बिल दंड म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर अब्दुल वकील शेख सलीम यांना २१६ युनिटच्या वीज चोरीचे ३५८६ एवढे वीज बिल दंड म्हणून आणि प्रत्येकी २ हजार एवढे बिल तडजोड रक्कम म्हणून आकारण्यात आली. वीजचोरी केल्याबाबद्दल चारही वीज चोरांना एकूण १८ हजार ८३७ एवढ्या रक्कमेचे वीज चोरीचे बिल आणि ८ हजार  एवढ्या रक्कमेचे तडजोडीचे बिल देण्यात आले आहे. कारवाई केलेल्या पथकात कार्यालयीन कर्मचारी सहायक अभियंता एस. डी. अडबे, निम्नस्तर लिपिक एस. ए. कवडे, वरिष्ठ तंत्रज्ञ  अ. खालेक मो. सुलेमान, आर. आर. घनसावंत,  एस. एन. पठाण यांचा समावेश होता.

ग्राहकांमध्ये खळबळवीज वितरण कंपनीकडून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या जिंतूर शहरातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण