सोनपेठ (जि. परभणी): सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात बुधवारी (८ एप्रिल) सकाळी १० वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात झाला. नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना भरधाव हायवा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तुळसाबाई पाडोळे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्या सहकारी द्रौपदाबाई वाघमारे (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सोनपेठ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतेचे काम करत असतानाच अपघातमिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला कर्मचारी सकाळी सोनखेड परिसरात स्वच्छतेचे काम करत होत्या. यावेळी एमएच-१२ एफसी ७४५९ क्रमांकाचा हायवा चालक आपल्या वाहनावरील ताबा गमावून बसला आणि त्याने थेट काम करत असलेल्या महिलांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तुळसाबाई पाडोळे या गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाल्या. नागरिकांनी त्यांना सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तुळसाबाई यांना तपासून मृत घोषित केले. तर जखमी द्रौपदाबाई वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस तपास आणि संतापघटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाठलाग करत हायवा थांबला. विठ्ठल मुंडे ( रा. रेवली, परळी) या चालकास नागरिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोनपेठ पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हायवा चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : In Sonpeth, a speeding truck struck two sanitation workers, killing one and seriously injuring another. The incident occurred during a cleanliness drive near Sonkhed, sparking outrage and prompting a police investigation into the driver.
Web Summary : सोनपेठ में, तेज रफ्तार ट्रक ने दो सफाई कर्मचारियों को टक्कर मार दी, जिससे एक की मौत हो गई और दूसरा गंभीर रूप से घायल हो गया। सोनखेड के पास सफाई अभियान के दौरान हुई इस घटना से आक्रोश फैल गया है और पुलिस ड्राइवर की जांच कर रही है।