शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे; आंबेडकरी अनुयायांचा स्थानिक पोलिसांवर रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:11 IST

या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

परभणी : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचे प्रथमदर्शनी अहवाल समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा वरुन आता रोष पोलीसांवर वाढला आहे. या घटनेचा तपास आपोआपच सीआयडीकडे जाणार आहे. 

या घटनेचा तीव्र निषेध करीत जिल्हासह राज्यभरातून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला. यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनावर तीव्र रोष असून आता या मृत्यू प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे राहणार असा प्रश्न पडला होता. हा तपास सीआयडीकडेच वर्ग व्हावा, तपासाला गती यावी अशी राज्यातील प्रमुख नेत्यांनी परभणीत भेटीदरम्यान मागणी केली होती. मात्र, आता शासन नियमानुसार सीआयडीकडे तपास वर्ग करावा लागतो. 

भूमिकेकडे लागले लक्षन्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या अशा घटनांमध्ये तपास हा राज्यस्तरावरून नेमलेल्या सीआयडी पथकाकडेच दिला जातो, असेच आजपर्यंत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातही समोर आले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक पोलीस अधिकारी मुग गिळून गप्पधरणे आंदोलन असो की विविध प्रमुख संघटना तसेच पाहणीसाठी आलेले राज्यातील नेते, आंबेडकरी अनुयायी यांच्याकडून आता तपास प्रक्रिया जलदगतीने कधी सुरू होणार ? तपास कोण करणार ? याचा आग्रह धरला जात आहे. एकीकडे स्थानिक पोलिस यंत्रणे वरचा रोष पाहता हा तपास सीआयडीकडेच वर्ग व्हावा अशी प्रमुख मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, याबाबत स्थानिक पोलीस अधिकारी तोंडावर बोट ठेवून कुठलीही प्रतिक्रिया देत नसल्याने तपास सीआयडीकडे वर्ग कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी