शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली शासकीय मदत; न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:28 IST

जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

परभणी : परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जाहीर केलेल्या दहा लाखांच्या शासकीय मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनातील महसूल विभागाच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सूर्यवंशी कुटुंबाला देण्यासाठी त्यांच्या घरी भेट घेतली. हा मदतीचा धनादेश न्याय मिळेपर्यंत स्वीकारणार नसल्याची भूमिका मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने घेतली आहे. त्यामुळे त्यांनी हा धनादेश नाकारला आहे.

परभणी शहरातील संविधान अवमानाच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना १५ डिसेंबरला झाली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनामार्फत बुधवारी महसूल विभागातील तलाठी काळे व अन्य कर्मचाऱ्यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील आई आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यासाठी आले होते. यावेळी प्रेमनाथ सूर्यवंशी व त्यांची आई आणि कुटुंबाने या मदतीचा धनादेश स्वीकारण्यास नकार दर्शविला. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

अद्याप एफआयआरची नोंदसुद्धा झालेली नाहीजोपर्यंत माझ्या भावाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत ही मदत स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या या मदतीबद्दल आभारी आहोत. या प्रकरणात अजून एफआयआरची नोंदसुद्धा झालेली नाही. ही नोंद लवकर व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे.- प्रेमनाथ सूर्यवंशी, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी