शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठरल्या कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:38 IST

दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. 

ठळक मुद्दे दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली.

पाथरी (परभणी ) : दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत. 

ग्रामीण भागातील वाढते भारनियमन आणि विजेची अनियमितता लक्षयत घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा वर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली. ज्या वेळी वीज उपलब्ध आहे त्या वेळी विजेवर हातपंप सुरू ठेवायचा, वीज नसेल त्या वेळी सौर ऊर्जा वर पंप चालायचा अशी ही योजना आहे. तालुक्यातील हदगाव, वडी आणि झरी या तीन गावात पाणी पुरवठा व स्वछता विभाग, भुजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने  सौरऊर्जावर आधारित दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना सुरु झाली. गावातील हातपंपावर वीज मोटार बसवून सौर ऊर्जा वर पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावच्या योजने साठी ५  लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. अंबाजोगाई येथील एका कंपनीने या योजनेचे काम देण्यात आले. 

वडी येथील सौर ऊर्जा वरील ही योजना गावच्या मंदिर परिसरात असलेल्या जुन्या हातपंपावर विधुत मोटार बसवून सुरू करण्यात आली. त्यासाठी सौर ऊर्जा प्लेट बसवण्यात आल्या. याबरोबर स्वतंत्र पाण्याची टाकी, त्यास दोन नळ  बसविण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक झाले आणि त्यानंतर योजना कायम बंद पडली. तर झरी येथे तर प्रात्यक्षिक न करणाच योजना कार्यान्वित  करण्यात आली. योजनेवर केलेल्या खर्च वाया गेला आहे, 

प्रात्यक्षिक झाले नाही 

वडी गावात सौर ऊर्जा आधारित नळ योजना साठी साहित्य बसविण्यात आले. मात्र, त्याची टेस्टिंग झालीच नाही. त्यामुळे नळाला पाणी आले नाही. तक्रार करून ही योजना सुरू होत नाही.- चंदाताई शिवाजी कुटे, सरपंच, वडी 

ऑनलाइन तक्रार केली या योजनेतून ग्रामस्थांना पाण्याचा थेंब मिळाला नाही, मोटार बंद आहे, सौरऊर्जा ची प्लेट खराब आहे, अशी ऑनलाइन तक्रार केली, संबंधित विभागाने या कडे लक्ष दिले नाही त्या मुळे योजना बंद पडली आहे- चंद्रहास सत्वधर, उपसरपंच झरी 

हदगाव ची योजना मात्र सुरूहदगाव बु येथे मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यापासून सुरू आहे, उन्हाळ्यात ही योजना गावाला पाणी पुरवठा करत आहे.

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदparabhaniपरभणी