साडेगाव येथील ऋषिकेश छत्रपती पांचाळ याने साडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षण सुरू असतानाच पांचाळ याने एक सॉफ्टेवअर तयार केले आहे. कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मूल्यमापन करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने ऋषिकेश पांचाळ याने हे सॉफ्टवेअर नुकतेच शाळेसाठी प्रदान केले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आठवी, नववी आणि दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षेची तयारी करून घेणे, दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी सॉफ्टवेअर उपयुक्त ठरणार आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात हे सॉफ्टवेअर शाळेसाठी देण्यात आले. यावेळी शाळेच्यावतीने ऋषिकेश पांचाळ याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक कांबळे, सरपंच काशिनाथ भांगे, शिक्षक शहाणे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्याने शाळेला दिले सॉफ्टवेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST