शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला बहिण माहेरी आली नाही; भाऊ भेटायला आल्याने रागात मेव्हण्याने पत्नीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:27 IST

रागीट पतीने ऑटोरिक्षाचा अपघात करून पत्नीला ठार केले

ठळक मुद्देदिवाळीत बहिण माहेरी न आल्याने भाऊ घरी आला

गंगाखेड: दिवाळीसाठी बहीण माहेरी आली नसल्याने भाऊ तिला भेटण्यासाठी घरी आला. याचा राग मनात धरून पतीने भरधाव वेगातील ऑटोरिक्षाचा अपघातकरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ( दि. १९ ) रात्री ७:३० वाजेच्या सुमारास कोद्री शिवारातील माळरानावर घडली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सिद्धेश्वर तिडके यांची मोठी बहिण कौशल्याचे लग्न सात वर्षापूर्वी उंडेगाव येथील परमेश्वर मंचकराव कातकडे याच्या सोबत झाले होते. यावर्षी कौशल्या परमेश्वर कातकडे ( ३० ) या माहेरी गेल्या नाही. यामुळे तिला भेटण्यासाठी सिद्धेश्वर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उंडेगावला आले.  परमेश्वरचा रागीट स्वभाव असल्याने सिद्धेश्वर केवळ चहा घेऊन अर्ध्या तासात परत गेला. याची माहिती कळल्यानंतर रात्री ७:३० वाजेता परमेश्वरने सिद्धेश्वरला फोन करून,' तू माझ्या घरी कशासाठी आला होता' असे विचारात शिवीगाळ केली. यानंतर कौशल्याला, 'तुझ्या भावाला बोलावून घे नाहीतर तुला खपवून टाकीन' अशी धमकी दिली. कौशल्याने घाबरत फोनवरच भावाला लगेच येण्याचे सांगितले. यामुळे सिद्धेश्वर आई -वडीलांसह उंडेगावकडे निघाला.  

दरम्यान, परमेश्वरने कौशल्याला ऑटोरिक्षात ( एम एच २२ एच २१०४ ) बसवून भरधाव वेगात नेल्याची माहिती सिद्धेश्वरला समजली. त्याने तत्काळ परमेश्वरला मोबाईलवर फोन केला. तेव्हा त्याने कौशल्या मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सिद्धेश्वर याच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीDeathमृत्यूMurderखून