सर्व घटकांनी सहभागी व्हावे : वरपूडकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लढ्यात सर्व घटकातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुरेश वरपुडकर यांनी पोखर्णी येथे केले. पोखर्णी नृसिंह येथे स्वाक्षरी मोहिमेच्या प्रारंभीप्रसंगी ते बोलत होते. शासकीय महाविद्यालय परभणी येथे व्हावे, अशी जिल्हावासीयांची भावना असून, यासाठी स्वाक्षरी मोहिमेचा लढा उभारला आहे, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीराम चव्हाण, तुकाराम वाघ, सभापती उकलकर, माजी सभापती बापूराव गमे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे, जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन सोनवणे, माजी सभापती गणेश घाटगे, माणिक आव्हाड, आत्माराम वाघ, बंडू देशमुख, माणिकराव वाघ, तुकाराम मडके, उपसरपंच शेषराव वाघ, विठ्ठल वाघ आदी उपस्थित होते. गणेश इक्कर यांनी सूत्रसंचालन केले. देवीदास कच्छवे यांनी आभार मानले.