रविवारी श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा गौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:48+5:302021-09-25T04:17:48+5:30

श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा गौरव ट्रस्टच्यावतीने दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा पुरस्कार गंगाखेड येथील सामाजिक ...

Shri Satyanarayana Kalani Smriti Seva Gaurav ceremony on Sunday | रविवारी श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा गौरव समारंभ

रविवारी श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा गौरव समारंभ

googlenewsNext

श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा गौरव ट्रस्टच्यावतीने दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा पुरस्कार गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ता मंजू दर्डा यांना जाहीर झाला आहे. मंजू दर्डा यांनी गेल्या १७ वर्षांपासून तळागळातील गरजवंतांची सेवा करण्यात आपले जीवन व्यतीत केले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी साहित्य वाटप, तसेच स्वखर्चातून १ हजार २५० जणांच्या शस्त्रक्रिया त्यांनी करून दिल्या आहेत. कोरोना काळात २५ हजार डब्यांचे वितरण करून अन्नदानाचे मोठे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यावर्षीचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू हे राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील जिओ लाईफ इंडिया एग्रीटेक प्रा. लि. चे अध्यक्ष विनोद लाहोटी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी लाहोटी यांचे ''''जीवन की वास्तविक सफलता'''' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, सचिव संदीप भंडारी यांनी केले आहे.

Web Title: Shri Satyanarayana Kalani Smriti Seva Gaurav ceremony on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.