शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला आता गोळ्या घाला अन् मग शक्तिपीठसाठी जमीन मोजा ! आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीच केली धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 06:50 IST

आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीच केली धरपकड; सहजपुरात संचारबंदीसदृश स्थिती

परभणी : आम्हाला गोळ्या घाला अन् जमीन मोजा, असा आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांसारखे ओढून बाजूला करीत शक्तिपीठ महामार्गासाठी प्रशासनाने प्रचंड पोलिस फौजफाट्यासोबत जबरदस्तीने जमीन मोजणी सुरू केल्याचा प्रकार तालुक्यातील सहजपूर जवळा येथे घडला.

प्रशासनाकडून शक्तिपीठ महामार्गासाठी देण्यात आलेल्या नोटिसा शेतकऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री कलम १६८ अन्वये नोटिसा घरांवर चिटकविण्यात आल्या. तसेच बीएनएस १६३ अंतर्गत निर्बंध लागू करून गटधारकांशिवाय इतरांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतर  जिल्ह्यातील ५०हून अधिक शेतकऱ्यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन ताडकळस व दैठणा, पूर्णा, नानलपेठ पोलिस ठाण्यात हलविण्यात आले. या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण होते. मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी व रास्ता रोको आंदोलनामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.  आम्हाला आता शासनाने गोळ्या घालाव्यात अन् मगच आमची जमीन बळकवावी, अशी संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांमधून उमटली.

पुरुष-महिलांनाही गुरासारखे ओढले

एका शेतकरी कुटुंबाने मोजणीला विरोध करताना सोबत पेट्रोलची बाटली आणली. तुमचा मावेजा नको, आमची जमीनही घेऊ नका, असे ते ओरडून सांगत होते. मात्र प्रशासन हट्टाला पेटल्याने पेट्राेलची बाटलीच काढत मला मरू द्या, असे म्हणत या कुटुंबानेच टाहो फोडला.

महसूल व पोलिस प्रशासन कशामुळे दडपशाही करीत आहे. आमच्या गावातून बाहेर निघा, असे म्हणत ग्रामस्थांनी सहजपूर रस्ताच अडविला. त्यावेळी प्रशासन दमदाटी करीत असल्याने महिलांनी एकच आक्राेश केला. मात्र पुरुषांसह त्यांनाही गुराढोरांसारखे अमानुषपणे ओढून नेत ताब्यात घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही काळानंतर  त्यांना सोडण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest land measurement for Shaktipeeth highway; police intervene.

Web Summary : Farmers in Parbhani protested against land measurement for the Shaktipeeth highway. Police used force, detaining over 50 farmers. Villagers blocked roads, expressing outrage and fear over the land acquisition process, demanding justice and halting the project.
टॅग्स :Farmerशेतकरी