शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 17:44 IST

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवार यांनी केली दोषींवर कारवाईची मागणी

मारोती जुंबडे

परभणी: सोमनाथ यांच्या मृत्यूप्रकरणी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यामुळे सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आमची असल्याचे मत खासदार शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी शनिवारी शहरातील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट दिली. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

पत्रकार परिषदेत खा. शरद पवार म्हणाले, संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबनेचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांबरोबर सोमनाथ सूर्यवंशी देखील रस्त्यावर उतरला होता. मात्र पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यास ताब्यात घेतले. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू होईपर्यंत शिक्षा देणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. घडलेला प्रकार फारच गंभीर असून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी घटनेची वस्तुस्थिती जाणून राज्य सरकारपर्यंत पोहचविणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार फौजिया खान, खा. निलेश लंके, खा. बजरंग सोनवणे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे,माजी आ. विजय भांबळे, भीमराव हतीअंबिरे, संतोष देशमुख आदींची यावेळी उपस्थित होती.

भेटी देण्यापेक्षा, कारवाई करावीउपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शनिवारी परभणी दौऱ्यावर येऊन सोमनाथच्या कुटुंबांची भेट घेणार असल्याचे पत्रकारांनी खा. शरद पवार यांना विचारले. सत्ताधाऱ्यांनी भेटी देणे चांगले असले तरीही केवळ भेटी न देता घडलेल्या घटनेतील दोषींवर कडक कार्यवाही करून चांगला संदेश द्यावा, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर त्यांनी टोला लगावला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी