शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'महादेव जानकरांना दिल्लीत पाठवा'; मोदींचा संदेश घेऊन आले देवेंद्र फडणवीस

By मारोती जुंबडे | Updated: April 1, 2024 19:52 IST

परभणी लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हीत डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. : देवेंद्र फडणवीस

परभणी : आजच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेवून परभणीकडे निघतेवेळी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहोत, असे म्हटले. तेव्हा त्यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकारांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील  महायुतीच्या सभेत सोमवारी सांगितले. महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीत आले होते. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. 

परभणी लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हीत डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. जानकरांसारख्या वंचित व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्यास महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी व परभणीकरांनी लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस केले. यासभेस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव, माजी आ. मोहन फड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, व्यंकट शिंदे, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, प्रवीण देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.विटेकरांना विधान भवनात नेणार - पवारराजेश विटेकरला तयारी करायला सांगितली होती. मात्र महादेव जानकर यांना प्रतिनिधित्व देण्याचं महायुतीमध्ये ठरलं. जानकरांनी लोकसभेची जागा मागितली होती. त्यामुळे महायुतीमधल्या सर्व जणांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे ठरविले. त्यानुसार जानकर यांना परभणीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. असे असले तरी मी विटेकरकडे दुर्लक्ष करणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यात त्यांना विधानभवनामध्ये घेऊन जाणार आहे. यासह जानकरांना मत म्हणजेच थेट मोदींना मत आहे, असे लक्षात ठेवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरparabhaniपरभणीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४