शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी इराणच्याच आकाशात होतं विमान! शेतकरी अरुणा थोरेंचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:40 IST

इराणच्या आकाशात थरार! परभणीच्या महिला शेतकऱ्याची युद्धाच्या आगीतून सुटका.

सेलू (जि. परभणी): "खाली अमेरिका आणि इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला होता आणि नेमक्या त्याच वेळी आमचे विमान इराण-इराकच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत होते. शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतरच आम्ही खऱ्या अर्थाने सुटकेचा नि:श्वास सोडला," अशा शब्दांत सेलू येथील महिला शेतकरी अरुणा भुजंग थोरे यांनी आपला काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव कथन केला.

युरोप दौरा आणि युद्धाचा प्रसंगराज्य शासनाच्या शेती तंत्रज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी अरुणा थोरे यांची निवड झाली होती. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड असा प्रवास करून त्या २७ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ॲमस्टरडॅम येथून एआय-१५६ विमानाने दिल्लीकडे निघाल्या. भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात बंदी असल्याने, त्यांचे विमान सिरिया, इराण आणि इराक या मध्यपूर्व आशियातील देशांवरून जात होते.

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी आकाशात!शुक्रवारी रात्री (भारतीय वेळेनुसार रात्री १०:५०) जेव्हा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला झाला, तेव्हा अरुणा थोरे यांचे विमान नेमक्या त्याच हवाई क्षेत्रात होते. विमानातील प्रवाशांना युद्धाची नेमकी माहिती नसल्याने मोठा गोंधळ टळला, मात्र जमिनीवर सुरू असलेल्या युद्धाच्या छायेतून हे विमान दिल्लीला पोहोचले. "जर आमचा दौरा आणखी एक दिवस असता, तर आम्ही तिथेच अडकलो असतो," असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

कुटुंबाची धाकधूक आणि सुखरूप पुनरागमनयुद्धाची बातमी कळताच अरुणा यांचे कुटुंब वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. शनिवारी दुपारी दिल्लीहून त्या मुंबई आणि पुणेमार्गे रविवारी रात्री सेलूत आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला गेलेल्या या महिला शेतकऱ्यासाठी हा प्रवास कधीही न विसरता येणारा असा ठरला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी