रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि. परभणी): पंडित महाराज डाके यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या 'फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण' सोहळ्याचा ८७ वा समारोप सोहळा सेलूमध्ये अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. १२ ते १९ मार्च दरम्यान अलंकापुरी, मयुरी पार्क (सातोना रोड) येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सप्ताहासाठी २१ हजार ज्ञानेश्वरी पारायण वाचकांसह लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार आहे.
हेलिकॉप्टरमधून माऊलींच्या पादुकांचे आगमनसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता माऊलींच्या पादुकांचे हेलिकॉप्टरमधून आगमन होईल. त्यानंतर बाबासाहेब महाराज मंदिरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत ७५० पताकाधारी, ७५० कलशधारी, ७५० तुळसधारी आणि ७५० विणेकरी असा वारकऱ्यांचा अभूतपूर्व लवाजमा सहभागी होणार आहे.
जय्यत तयारी आणि जनसहभागया सोहळ्यासाठी ८ एकर जागेत भव्य मंडप उभारणीचे काम सुरू असून, ही सेवा माजी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी २६ समित्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, महाप्रसादासाठी परिसरातील ८५ गावांतील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, दररोज विविध अन्नपदार्थांची रसद या गावांतून पुरवली जाणार आहे.
भक्तीमार्गाची पर्वणी: नामवंतांची उपस्थितीसप्ताहाच्या काळात दररोज काकडा भजन, २१ हजार भाविकांचे पारायण वाचन आणि दुपारी २ ते ५ या वेळेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची 'श्री महाभारत संदेशकथा' होणार आहे. तसेच दररोज सकाळी ११ आणि रात्री ८ वाजता नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होतील. १९ मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल.
Web Summary : Selu is set to host a grand week-long 'Dnyaneshwari Parayan' festival. Mauli's Padukas will arrive by helicopter, followed by a procession. The event features 21,000 participants, discourses, and community meals.
Web Summary : सेलू में 'ज्ञानेश्वरी पारायण' का भव्य आयोजन होगा। माऊली की पादुकाएँ हेलीकॉप्टर से आएंगी, फिर शोभायात्रा निकलेगी। कार्यक्रम में 21,000 प्रतिभागी, प्रवचन और सामुदायिक भोजन होंगे।