शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

परभणी शहरासाठीचे टंचाई प्रस्ताव लाल फितीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 19:18 IST

पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही.

परभणी : पाणीटंचाई निवारणासाठी महापालिकेने तयार केलेला १ कोटी ९३ लाख रुपयांचा टंचाई निवारणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास अद्याप मंजुरी न मिळाल्याने शहरातील टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.

परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. या बंधाऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासियांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी शहरात सध्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे १० ते १२ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना ३५ वर्षापूर्वीची जुनी असून शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात शहरवासियांपर्यंत पोहोचत नाही. दहा- दहा दिवस पाणी येत नसल्याने टंचाई तीव्र झाली आहे. 

शहरातील अनेक भागांत जलवाहिनी पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना खाजगी बोअरवर अवलंबून रहावे लागते. उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने बोअरही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शहरात टंचाईची परिस्थिती निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाने उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यात शहरातील १० विहिरींमधील गाळ काढणे, विहीर खोलीकरण करणे या कामांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपये आणि शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९४ लाख ६३ हजार रुपये, विंधन विहीर, हातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्धा उन्हाळा सरला असून शहरात पाणीटंचाई वाढली आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याने शहरातील टंचाईची कामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरु झाली तर नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यातील कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

मनपाने सुरू केला दहा टँकरने पाणीपुरवठापरभणी शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने १० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यात १२ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर असून पाच हजार लिटर क्षमतेचे उर्वरित टँकर आहेत. शहरातील भीमनगर, परसावतनगर, संजयगांधी नगर , गौस कॉलनी, झमझम कॉलनी, शिवनेरीनगर, लक्ष्मीनगर, सागरनगर, गालिबनगर, सिंचननगर, धनलक्ष्मीनगर, मराठवाडा प्लॉट, पोस्ट कॉलनी आदी भागात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. 

हातपंप दुरुस्ती रेंगाळलीशहरामध्ये ६०० पेक्षा अधिक सार्वजनिक हातपंप असून निम्मे हातपंप बंद आहेत. काही हातंपप केवळ साहित्य नसल्याने बंद आहेत. हातपंपांची दुरुस्ती झाली तर पाणीटंचाईवर बऱ्याच अंशी मात होऊ शकते. मात्र मंजुरी अभावी हातपंप दुरुस्तीचे कामही सुरु झालेले नाही. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाgovernment schemeसरकारी योजना