शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

५८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी झाले आरक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 4:37 PM

परभणी तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

ठळक मुद्देपरभणी तालुक्यातील ग्रामपंचायतीसोडत पद्धतीने आरक्षण जाहीर

परभणी: तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ११७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २० नोव्हेंबर रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून, त्यातील ५८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर महिला राज येणार आहे.

तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी येथील बी.रघुनाथ सभागृहात आरक्षण सोडतीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच सोडतीसाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, मंदार इंदूरकर, वसीम पठाण यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी ८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहे.

अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहे. त्याचप्रमाणे खुल्या प्रवगार्साठी ३४ ग्रामपंचायतींचे तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ३३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहेत. सरपंच पदाच्या आरक्षणाविषयी ग्रामीण भागात मोठी उत्सूकता लागली होती. आरक्षण जाहीर होताच गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीची समिकरणे जुळविण्यास प्रारंभ केला आहे.

असे आहे सरपंच पदाचे आरक्षण- सर्वसाधारण : आंगलगाव, जांब, झरी, ब्राह्मणगाव, दामपुरी, एकुरखा तर्फे पेडगाव, इंदेवाडी, कैलासवाडी, किन्होळा, मांडाखळी, पेगरगव्हाण, पिंगळी कोथाळा, सिंगणापूर, शिर्शी खु., सूरपिंपरी, उखळद, शहापूर, हसनापूर, आसोला, पिंगळी, सायाळा खटींग, कौडगाव, कारेगाव, तट्टूजवळा, रायपूर, संबर, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, धार, मांगणगाव, पाथरा, शर्शी बु., इस्माईलपूर, पान्हेरा (गव्हा), नरसापूर.

- सर्वसाधारण महिला : करडगाव, वरपूड, धारणगाव, सोन्ना, वडगाव सुक्रे, शेंद्रा, बोरवंड खु.,  परळगव्हाण, पिंपळा, ठोळा, पिंपळगाव सय्यदमियाँ, साटला, साडेगाव, आनंदवाडी, कोटंबवाडी, पिंपळगाव टोंग, टाकळी बोबडे, साळापुरी, बाभुळगाव, मटकऱ्हाळा, इठलापूर देशमुख, कुंभारी (कारला), हिंगला, दैठणा, उजळंबा, आंबेटाकळी, नांदगाव बु., नांदगाव खु., जलालपूर (खानापूर तर्फे झरी),  सावंगी खु., नागापूर, नांदापूर, मांडवा.

- नागरिकांचा मागास प्रवर्ग : भोगाव, उमरी, वांगी, झाडगाव, नांदखेडा, पोरवड, डिग्रस, गोविंदपूर (सारंगपूर), सनपुरी (सुलतानपूर), धसाडी, डफवाडी, तरोडा (ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव),  पांढरी, वाडी दमई, बलसा खु,, मिर्झापूर.

- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : साबा, पोखर्णी नृ., पेडगाव, जोडपरळी, टाकळगव्हाण, ताडपांगरी, राहाटी, आळंद (मोहपुरी), आलापूर पांढरी, आमडापूर, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, दुर्डी, समसापूर, बाभळी, मिरखेल, काष्टगाव.

- अनुसूचित जमाती महिला : भारस्वाडा- अनुसूचित जमाती : लोहगाव- अनुसूचित जाती : देवठाणा, पोरजवळा, ताडलिमला, टाकळी कुंभकर्ण, सहजपूर (जवळा), माळसोन्ना, पारवा, धोंडी.- अनुसूचित जाती महिला : मुरुंबा, आर्वी, पिंपळगाव ठोंबरे, पिंपरी देशमुख, वडगाव तर्फे टाकळी, तामसवाडी, धर्मापुरी, बोरवंड बु.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायतParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी