चारठाणा ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नंदकिशोर यांच्याकडे आहे. २८ नोव्हेंबर रोजी प्रशासक ग्रामपंचायतीत काम करीत असताना सरपंच बी. जी. चव्हाण यांनी घंटागाडी चालक अन्वर शहा कठु शहा यास माझ्यासोबत पाठवण्यास का नकार देत आहेत. यावरून प्रशासकासोबत वाद घातला. प्रशासकाने आचारसंहिता असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी पाठवता येत नाही, असे सांगितल्यावर बी. जी. चव्हाण व प्रशासक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. याबाबत नंदकिशोर यांनी प्रशासनासोबत अशा पद्धतीने सरपंच वागत असतील तर ग्रामपंचायतचा कारभार करायचा कसा असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भातली क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनात या क्लिपची जोरदार चर्चा आहे. दरम्यान सरपंच बी.जी, चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
सरपंच व प्रशासकाची जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST