शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लायकी नसताना पगारवाढ मंजूर; परभणी जिल्हा परिषदेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:10 IST

 शासनाच्या निर्णयानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही कर्मचाऱ्यांना वेतनवाढी मंजूर करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली

परभणी :  शासनाच्या निर्णयानुसार संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही कर्मचाऱ्यांना वेतनवाढी मंजूर करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी रोखून त्यांना प्रदान केलेली रक्कम वसूल करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार शासकीय सेवेतील गट अ, गट ब, गट क या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत असताना संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे, म्हणून याबाबतची अर्हता ठरविण्यात आली होती. त्यानंतर ३ मे २००० रोजी या संदर्भात आदेश देऊन १ जानेवारी २००१ पासून या आदेशाचा प्रभाव लागू करण्यात आला. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षाच्या आत संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना यामधून सूट देण्यात आली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास ३१ डिसेंबर २०१७ ची अंतिम मुदत देण्यात आली होती.

संगणक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याचे आदेश असताना परभणी जिल्हा परिषदेत मात्र या शासन निर्णयाचे उल्लंघन करुन सर्रासपणे वेतनवाढी देण्यात आल्याची बाब जि.प. मुख्य कार्यकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी या संदर्भात आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत १५ सप्टेंबर रोजी त्यांनी सर्व विभागप्रमुखांच्या नावे आदेश काढला असून त्यामध्ये संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही जुलै २००८ पासून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मंजूर केल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही गंभीर स्वरुपाची बाब आहे. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी थांबविण्यात याव्यात. तसेच त्यांना अति प्रदान केलेल्या रकमेची तात्काळ वसुली करुन रक्कम शासकीय खात्यात भरणा करावी, नियमबाह्यरीत्या वेतनवाढी मंजूर करणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश पृथ्वीराज यांनी दिले. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही पृथ्वीराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

अनियमिततेचा कळससंगणक अर्हता प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण नसतानाही शासकीय नियम डावलून अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वार्षिक वेतनवाढ मिळविली आहे. त्यामुळे या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी शासनाच्या तिजोरीवर १० वर्षापासून डल्ला मारला असला तरी आता सीईओं बी.पी.पृथ्वीराज यांच्या निर्णयाने संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. १० वर्षापासून उचललेली वार्षिक वेतनवाढीची रक्कम व्याजासह त्यांना शासनाकडे जमा करावी लागणार आहे. ही रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे. शिवाय अशा अपात्र कर्मचाऱ्यांवर मेहरबानी दाखविणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे संबंधित विभागप्रमुखांना आता जबाबदार अधिकाऱ्यांची नावे सीईओंना द्यावी लागणार आहेत. 

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदparabhaniपरभणीEmployeeकर्मचारीfundsनिधी