शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परभणी पाणीपुरवठा करताना सेलू नगरपालिकेची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:34 PM

निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे विजेचा वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने नियोजन कोलमडले आहे.दिवसेंदिवस शहराचा चारही बाजूने विस्तार होत असून लोकसंख्या ५० हजार झाली आहे. शहरात नगरपालिकेने जवळपास ४ हजार नागरिकांना नळजोडणी दिली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे.निम्न दुधना प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शहराला दोन महिन्यांपासून दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच नदी काठावरील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने तसेच परभणी व पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १ जून रोजी प्रकल्पाच्या मृत साठ्यातून १५ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सद्यस्थितीत सेलू शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ४ दिवसापांसून वादळी वाºयासह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.जलकुंभ भरण्यासाठी नगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे काही भागात २ दिवसआड सोडण्यात येणारे पाणी ३ दिवसाआड सोडण्यात येत आहे. मृतसाठ्यातून पाणी सोडल्याने दुधना प्रकल्पातील बॅकवॉटर परिसरातील १ कि.मी. अंतरावरील जमीन उघडी पडली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.एकच विहीर पाण्याखाली : १४ विहिरी पडल्या उघड्या४शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे पंपहाऊस प्रकल्पाजवळील देवला या गावालगत आहे. पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी प्रकल्पात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या आहेत. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर १४ इंटेकवेल कोरड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच विहीर पाण्यात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.४शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी देवला येथील शेतकऱ्यांनी स्वत:हून विद्युत मोटारी काढून घेतल्या आहेत. प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला असला तरी शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडे तीन एमएलडी लागते पाणी४शहराला दररोज तब्बल साडेतीन एमएलडी पाणी लागते. नगरपालिकेकडून ६ झोन करून परिसरानुसार २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र विजेचा वारंवार अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभ भरताना वेळ लागत आहे. परिणामी २ ऐवजी काही भागात ३ दिवसाआड पाणी येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईMuncipal Corporationनगर पालिका