शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

सेलू येथे पेट्रोलपंपावर धाडसी चोरी; पाच संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:37 PM

वालूर येथील एका पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लांबिवली

सेलू (परभणी ) : तालुक्यातील वालूर येथील एका पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकम व तीन मोबाईल असा १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली. दरम्यान, या प्रकरणी सेलू पोलिसांनी पाच संशियातांना पाच ताब्यात घेतले आहे.

वालूर येथे शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल यांचा सेलू-वालूर रस्त्यावर पेट्रोलपंप आहे. सोमवारी मध्यरात्री दोन चोरटे तोंडावर कपडा बांधून पेट्रोलपंपाच्या कॅबीनमध्ये दाखल झाले. पंपाचे व्यवस्थापक चिनके यांच्या गळ्याला त्यांनी चाकू लावला. दुसरा कामगार मोहनच्या गळ्याला दोरीने बांधले. त्यानंतर चोरट्यांनी मोहन काजळे याच्या गल्ल्यातून ५० हजार तर पंपाचे दुसरे कामगार ज्ञानेश्वर मगर यांच्या गल्ल्यातील ४५ हजार रुपये घेतले. तसेच दोन्ही कामगार व पंपाच्या कॅबीनमध्ये झोपण्यासाठी आलेला कामगारांचा मित्र हरिष पांढरे या तिघांचे मोबाईलही चोरट्यांनी लांबविले. चोरट्यांनी पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेराही फोडून सोबत नेला. 

पंपाचे मालक तोष्णीवाल यांच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी भेट दिली. या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा