शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

परभणी जिल्हा आरक्षणासाठी कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:53 IST

औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला़ परभणी शहरात झालेल्या किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता जिल्हाभरात बंद शांततेत पार पडला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला़ परभणी शहरात झालेल्या किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता जिल्हाभरात बंद शांततेत पार पडला़मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आठ दिवसांपासून मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत़ परभणी जिल्ह्यात मानवत, सोनपेठ, पाथरी येथे धरणे आंदोलन सुरू आहे़ सोमवारी गंगाखेड येथे बंद पाळण्यात आला़ याच दरम्यान, औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतल्याने आंदोलनाला उग्र स्वरुप प्राप्त झाले़ रात्री उशिरा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली़ या बंदला परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़मंगळवारी सकाळपासूनच परभणी शहरातील बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद ठेवली होती़ सकाळी १० वाजेच्या सुमारास १०० ते १५० युवकांनी बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले़ यावेळी बंद न केलेल्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली़ शनिवार बाजार, नानलपेठ कॉर्नर येथून युवक बंदचे आवाहन करीत असताना शिवाजी चौक ते नानलपेठ कॉर्नर भागात एका स्वीटमार्टवर दगडफेक झाली़ तेथून निघालेला हा जमाव शिवाजी चौकात पोहचला़तेथून पुढे गांधी पार्क येथे युवकांच्या जमावाने काही दुकानांवर दगडफेक केली़ हा जमाव जिल्हा स्टेडियमसमोरून जात असताना स्टेडियम आणि जलतरिणका परिसरातील वृत्तपत्रांच्या दोन कार्यालयांवरही दगडफेक झाली़ तसेच देशमुख हॉटेल परिसरातही एका दुकानावर दगडफेक करण्यात आली़जमावाने केलेल्या दगडफेकीत दोघे जण जखमी झाले आहेत़ त्यापैकी एका जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ हा जमाव दर्गा रोड परिसरातही बंदचे आवाहन करीत फिरत असताना आझम चौक भागात दगडफेक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या ठिकाणची सर्व दुकाने बंद झाली़ त्यापूर्वी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर परिसरातही दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यामुळे मोठा जमाव जमला होता़अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे हे फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली़ दुपारी १२़३० वाजेपर्यंत झालेल्या या दगडफेकीच्या घटना वगळता परभणी शहरात बंद शांततेत पार पडला़ दुपारी २ वाजेनंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली होती़परभणीत आंदोलकांवर सौम्य लाठीमारबंद दरम्यान सकाळी युवक शहरात आवाहन करीत फिरत होते़ काही दुकाने सुरू असल्याने या दुकानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या़ बंदचे आवाहन करीत हे युवक दर्गा रोडवरील आझम चौकात आले़ या ठिकाणचे दुकाने बंद केल्यानंतर हा जमाव तेथून पुढे निघाला़ मात्र या ठिकाणी काही युवक जमा झाले होते़ त्यामुळे परिस्थिती तणावाची बनली़ या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही लावला होता़ परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकची कुमक मागवून घेतली़ यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला़ त्यानंतर काही वेळातच जमाव पांगला़ त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली़ दुपारी २ वाजेनंतर मात्र शहरातील तणाव निवळला होता़२० मिनिट रोखली सचखंडमराठा समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी रेलरोकोचेही आवाहन केले होते़ या आवाहानानुसार सकाळी १० वाजेच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले़ राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला़ आदिलाबाद-परळी आणि हैदराबाद-औरंगाबाद या दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या रोखून धरल्या़ त्यानंतर ११़१० मिनिटांनी सचखंड एक्सप्रेस रेल्वेस्थानकावर दाखल झाली़ ही गाडीही आंदोलकांनी २० मिनिटे रोखून धरत जोरदार घोषणाबाजी केली़बसस्थानकाचे दोन्ही गेट बंदबंदच्या काळात बसेसवर दगडफेकीच्या घटना होत असल्याने मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ परभणी विभागातील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सातही आगारातून मंगळवारी एकही बस धावली नाही़ याच दरम्यान, वसमत आगारामध्ये घुसून उभ्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर परभणीत महामंडळ प्रशासनाने बसस्थानकाचे दोन्ही गेट बंद करण्याचा निर्णय घेतला़ अनेक वर्षानंतर प्रथमच स्थानकाचे गेट बंद करण्यात आले होते़ दिवसभर बसस्थानकात एकही बस उभी केली नाही़ तसेच प्रवासीही नसल्याने हे बसस्थानक ओस पडले होते़पूर्णेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनपूर्णा- शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ आंदोलकांनी तीव्र निदर्शने करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला़ मंगळवारी पूर्णा, चुडावा, ताडकळस, झिरोफाटा आदी ठिकाणच्या बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या़ नांदेड टी पॉर्इंट येथे शेकडो युवकांचा जमाव जमा झाला़ तेथून शहराकडे मोर्चा काढण्यात आला़ यावेळी ठिक ठिकाणी टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला़ हा मोर्चा शिवाजी चौक येथे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़ शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ तहसीलदार श्याम मदनूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांना मागण्यांचे ेनिवेदन देण्यात आले़ तसेच चुडावा येथे मराठा समाजातील युवकांनी सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले़ या आंदोलनामुळे पूर्णा-नांदेड राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़गंगाखेड दुसºया दिवशीही बंदगंगाखेड- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजबांधवांनी दुसºया दिवशीही बंद पाळला़ दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ सोमवारच्या बंदला हिंसक वळण मिळाले होते़ मंगळवारी मात्र शांततेत बंद पार पडला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास युवकांनी रॅली काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले़ त्यामुळे दुसºया दिवशीही संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली़ गंगाखेड आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली़ सोमवारी तालुक्यात वाहनांची तोडफोड व जाळपोळ झाली होती़ या प्रकरणी सुमारे २५ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या फिर्यादीवरून सुमारे २०० ते २५० जणांविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांना ताब्यात घेतले आहे़ उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे तपास करीत आहेत़टायर पेटविलेपालम तालुक्यात सलग दुसºया दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ मंगळवारी बंदची तिव्रता वाढली होती़ युवकांनी सकाळपासूनच राज्य रस्त्यावर टायर पेटवून देत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़पाथरीत २० आंदोलनकर्त्यांनी केले मुंडणपाथरी-मराठा समाजाच्या वतीने पाथरी येथे १९ जुलैपासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनाची तीव्रता वाढत असून, २४ जुलै रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले़ २० आंदोलकांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला़४येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे़ आंदोलनाचा सहावा दिवस असून, औरंगाबाद जिल्ह्यात एका युवकाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतल्याची घटना सोमवारी घडली़४या घटनेनंतर आंदोलक अधिकच संतप्त झाले असून, घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी पाथरी तालुक्यात बंद पाळण्यात आला़ शहरातील संपूर्ण बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये बंद होती़४शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी मुंडण केले़ यात मुस्लीम समाजातील शेख समीर या युवकाने मुंडण करून आंदोलनास पाठिंबा दर्शविला़ पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह तुकाराम पौळ, भागवत कोल्हे, संदीप टेंगसे, कृष्णा शिंदे, विष्णू काळे, अमोल टाकळकर, सोमेश गरड, अनिल काळे, तुकाराम शिंदे, विशाल घांडगे, गणेश टाकळकर यांच्यासह २० जणांनी मुंडण केले़

टॅग्स :parabhaniपरभणीmarathaमराठाreservationआरक्षण