शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात २६३ बाधितांची नोंद; ६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST

परभणी जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत शुक्रवारी घट झाल्याचे दिसून आले. या दिवशी जिल्ह्यात २६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. ...

परभणी जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत शुक्रवारी घट झाल्याचे दिसून आले. या दिवशी जिल्ह्यात २६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात तब्बल १६७ रुग्ण हे फक्त परभणी शहर व तालुक्यात आढळले आहेत. याशिवाय सेलू तालुक्यात २७, पूर्णा तालुक्यात १५, जिंतूर तालुक्यात २२, गंगाखेड तालुक्यात १०, पाथरी, मानवत तालुक्यात प्रत्येकी २, सोनपेठ तालुक्यात ४ तर पालम तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त हिंगोली, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांची नोंद परभणीत झाली आहे. तसेच परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरुष व २ महिला आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरुष व २ महिला अशा ६ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. कोरोनावर मात केल्याने २५१ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १२ हजार २५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत १ हजार २६० रुग्णांवर विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी येथे आढळले रुग्ण

परभणी शहरातील लक्षी नगर, विद्या नगर, कच्छी बाजार, शिवराम नगर, कृषी सारथी कॉलनी, वांगी रोड, जिल्हा सामान्य रुग्णालय, व्यंकटेश नगर, त्रिमूर्तीनगर, काबरा प्लॉट, अनन्या हॉस्पिटल, संभाजी नगर, आनंद नगर, आमदार कॉलनी, रामकृष्णनगर, मेहराज नगर, सरस्वती नगर, तेली गल्ली, गव्हाणे चौक, रायपूर, पिंगळी, पंचशील नगर, लोहगाव, कल्याण नगर, राजपूत कॉलनी, संगम कॉलनी, पार्वती नगर, माळी गल्ली, डेंटल कॉलेज, कृषी नगर, विश्व कॉर्नर, शिवाजीनगर, श्रीकृष्ण नगर, शिवाजी रोड, श्रेयस कॉलनी, शिक्षक कॉलनी, पारीख कॉलनी, सेलू, माऊली नगर, सेलू, येलदरकर कॉलनी, भाग्यलक्ष्मी कॉलनी, परसावत नगर, गणेश नगर, सेलू, समता नगर, ग्रीन पार्क, जिंतूर, राजूर, गजानन नगर, जिंतूर, पिंपळगाव, गणेश नगर सेलू, दत्तनगर सेलू, पूर्णा तालुक्यातील गौर, सेलू येथील समता नगर, पिंपळगाव लिखा, सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कावलगाव, पालम तालुक्यातील पेंडू आदी ठिकाणी कोरोनाबधित रुग्ण आढळले.