शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानवतच्या निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:58 IST

दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मानवत (परभणी ) : येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दलालांमार्फत होणारे नागरिकांचे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी या दलालांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

मानवत तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. दाम दुप्पट करण्याचा मार्ग म्हणून रियल इस्टेटकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन होत आहे. त्यामुुळे पैसे वाचविण्याच्या नादात व अज्ञानामुळे आजकाल सर्रास ज्यांना कायद्याची काहीही माहिती नाही, अशा दलालांमार्फत दुय्यम निबंधक कार्यालयात राजरोसपणे खरेदी विक्री, बक्षीस भाडेपट्टा व हक्क सोडपत्र तयार करून नोंदणी केली जात आहे. त्यामुळे लोकांचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. तसेच नागरिकांना बँकेचे कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. वास्तविक पाहता कोणताही व्यवहार हा कायद्यानुसार हक्काबाबत पडताळणी करूनच तज्ज्ञ व्यक्तीकडून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्ताऐवज नोंदविला गेला पाहिजे.

परंतु, आजघडीला सदर बाबीची पडताळणी न करता सर्रासपणे दलालांमार्फत खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे आज मानवत येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे दलालांच्या विळख्यात सापडले असून दलालांमार्फत दररोज दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार नोंदविले जातात. हे दलाल स्वत:ला कायद्याचे तज्ज्ञ समजून वकील असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत आमचा वशिला आहे,  असे दाखवून दस्तकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे दलालांमार्फत नागरिकांचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांना बंदी घालावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

वकील संघाने घेतला ठरावमानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील दस्त नोंदणीकरिता आलेल्या नागरिकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित दलालांचा निषेध नोंदवून या दलालांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात यावा व त्यांच्याविरुद्ध दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात यावी, असा ठराव मानवत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल जाधव यांनी मांडला. या ठरावाला सूचक म्हणून अ‍ॅड. एम. आर. बारहाते यांनी समर्थन दिले. तर के.एन. राठोड यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी वकील संघाचे सचिव अ‍ॅड. ए.ए. पांडे, अ‍ॅड. सुरेश बारहाते, अ‍ॅड. सतीश बारहाते, अ‍ॅॅड. आर.आर. केरे, अ‍ॅड. बी.आर. चिलवंत, अ‍ॅड. अमोल जोशी यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :MONEYपैसाTahasildarतहसीलदारparabhaniपरभणी