मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड सेलू रस्त्यावरील इरळद पाटीजवळ ट्रक आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील पती जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना २३ डिसेंबरला सकाळी ११:३० च्या सुमारास घडली.
राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किशनगढ येथील काही भाट जोडपे तालुक्यात आले आहेत. हे जोडपे वेगवेगळ्या गावात जाऊन विविध जातींच्या वंशावळी सांगणारे आहेत. त्यापैकी एक जोडपे दुचाकीने (क्रमांक आरजे ४२-एसजे ७६९९) मानवतहून सेलूकडे जात होते. दरम्यान, इरळद पाटीजवळ येताच ट्रक (क्रमांक एमएच १८-बीडब्लू ०५७९) व दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील संदीप राजेंद्र भाट (रा. किशनगढ, जि. अजमेर, राजस्थान) हे जागीच ठार झाले. तर पत्नी संगीता राजेंद्र भाट या गंभीर जखमी झाल्या. त्यांना मानवत ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
संदीप राजेंद्र भाट यांची उत्तरीय तपासणी कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. अपघाताचे वृत्त कळताच पोउनि प्रमोद देवकते, बीट जमादार अतुल पांचांगे, शेख फैयाज व संतोष शिंदे घटनास्थळी पोहोचले. ईरळदचे सरपंच अशोक कचरे यांच्यासह त्यांचे सहकारी विष्णू बारहाते, गोपाळ मगर, शेख आमजत, संतोष देशमुख, लक्ष्मण वैद्य, केशव कचरे, मुंजा वारकड यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना खबर देत जखमीला रुग्णालयात पोहोचणे आणि शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात मदत केली.
Web Summary : A Rajasthani Bhat family, known for preserving genealogies, met with tragedy near Manvat. Sandeep Bhat died in a truck accident; his wife was seriously injured. The accident occurred near Erlad Pati on the Manvat-Selu road. Police are investigating.
Web Summary : वंशावली संरक्षित करने के लिए जाने जाने वाले राजस्थानी भाट परिवार के साथ मानवत के पास त्रासदी हुई। संदीप भाट की ट्रक दुर्घटना में मौत हो गई; उनकी पत्नी गंभीर रूप से घायल हो गईं। दुर्घटना मानवत-सेलू मार्ग पर इरलाद पाटी के पास हुई। पुलिस जांच कर रही है।