शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पावसाचे थैमान; दुधना-कसुरा नदीच्या पुराने पाथरी ते परभणी महामार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 17:12 IST

अनेक ओढया, नाल्याला पूर आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प

- मोहन बोराडे सेलू (परभणी ) : दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधना, कसुरा, करपरा या मुख्य नद्यांना पूर आल्याने सेलू- मानवत- परभणी, सेलू- पाथरी हे प्रमुख महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ओढया, नाल्याला पूर आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, वाई, बोध येथे पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर व रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने दुधना, कसुरा, करपरा या मुख्य नद्यांना पूर आला आहे. तसेच ग्रामीण भागातील जोड रस्त्यावरील ओढ्या, नाल्याला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक बंद झाली आहे. कुंडी पाटीवरील कसूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सेलू- पाथरी तसेच सेलू मानवत रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव येथील कसूर नदीच्या पुलावरून पाणी आल्याने सेलू- मानवत- परभणी हा रस्ता बंद झाला आहे. सेलू- वालूर मार्गावरील राजवाडी येथील दुधना नदीच्या पुलावरून पाणी आल्याने रविवारपासून हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

तसेच शहराच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे रविवारी रात्री नालाशेजारी असलेल्या हेमंत नगर व शिवाजी नगरातील घरामध्ये पाणी घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील गिरगाव येथील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे गावाला पाण्याचा वेढा पडला होता. पुराच्या पाण्यामुळे वाई, बोध, बोरकिनी येथील जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे. दरम्यान, रविवार व सोमवार सलग दोन दिवस संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

उजवा कालवा फुटलामुसळधार पावसामुळे कसुरा नदीला पूर आला आहे. तसेच निपाणी टाकळी येथील नाल्याला देखील पुर आल्यानंतर टाकळी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा फूटला असून पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस