शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी १९ विद्यापीठांचे संघ परभणीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:19 IST

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु झालेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या काळात १५ व्या आंतरराज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झालीइंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

परभणी : वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात सुरु झालेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवामध्ये १९ कृषी आणि अकृषी विद्यापीठातील ७१४ कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कला सादरीकरणाला प्रारंभ झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर या काळात १५ व्या आंतरराज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यानंतर दुपारी ३.३० वाजेपासून विविध कलामंचावर कला प्रकाराचे सादरीकरण केले जात आहे. संगीत, नाटक, वाद- विवाद, चित्रकला अशा विविध कला प्रकारांचे दररोज सादरीकरण होणार आहे.

राज्यातील कानाकोप-यातून आलेले विद्यार्थी संपूर्ण तयारीनिशी महोत्सवात दाखल झाले असून आपल्या कलांचे सादरीकरण करण्यापूर्वी सराव करीत असताना पहावयास मिळाले. विद्यार्थ्याच्या संघासमवेत त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि सहकारी मित्रही युवक महोत्सवात दाखल झाले असून पाच दिवस विविध कला सादर केल्या जाणार आहेत. ९ आॅक्टोबर रोजी खा.बंडू जाधव यांच्या उपस्थितीत या युवक महोत्सवाचा समारोप होणार असून समारोप कार्यक्रमात महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित केले जाणार आहे. 

तीन मंचावरुन विद्यार्थ्यांनी  केले कलेचे सादरीकरणसकाळपासूनच विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक असल्याचे पहावयास मिळाले. संपूर्ण विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवस या भव्य मंचावरुन विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.  रविवारी उद्घाटनानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास स्कीट या कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. राज्यातील विविध विद्यापीठांतील १८ संघांनी स्कीट या कलाप्रकारात सहभाग घेतला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विद्यर्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संगीत या कला प्रकारामध्ये शास्त्रीय वैयक्तिक वाद्य वादन ही कला सादर करण्यात आली. याच परिसरात उभारलेल्या एका मंचावर वाद-विवाद स्पर्धा घेण्यात आली. या कला प्रकारांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना उत्साहही वाखाणण्याजोगा होता. 

विद्यार्थ्यांनी टिपला कुंचल्याने निसर्गकृषी विद्यापीठातील वेगवेगळ्या कोप-यात बसून आपल्या कुंचल्यात निसर्गचित्र रेखाटणारे स्पर्धक युवक महोत्सवात आकर्षण ठरले होते. निमित्त होते, फाईन आर्ट कला प्रकाराचे. रविवारी विद्यार्थ्यांना ‘आॅन द स्पॉट पेंटींग’ रेखाटण्याचा विषय परिक्षकांनी दिला होता. उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात  कला प्रकारांच्या सादरीकरणास प्रारंभ झाला.‘फाईन आर्ट’ या कला प्रकाराच्या पहिल्याच दिवशी आॅन द स्पॉट पेंटींग हा विषय देण्यात आला. या स्पर्धेत १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विषयानुसार विद्यार्थ्यांनी विद्यापीठातीलच निसर्ग आपल्या कुंचल्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आणि एक-एक विद्यार्थी विद्यापीठाच्या परिसरातच कॅन्व्हास, ब्रश, रंग घेऊन कामाला लागला. 

ललित कला समितीच्या अध्यक्षा डॉ.जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. प्रा.अमोल सोनकांबळे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी स्पर्धेचे नियोजन केले. या स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील माजी प्राचार्य दिलीप बडे, मुंबई येथील सतीश माने, दापोली येथील प्रा.सरफराज दिलदार बटे आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

विद्यापीठ परिसरातून काढली रॅलीयुवक महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी विद्यापीठ परिसरातील रस्त्यांवरुन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राज्यभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभापासून निघालेली ही रॅली विद्यापीठातील विविध भागातून उद्घाटन स्थळापर्यंत पोहचली. 

निवास व भोजनाची व्यवस्थायजमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने या युवक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ परिसरातच निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे.