- राजन मंगरुळकर
परभणी : महापालिकेच्या १६ प्रभागातील ६५ जागांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मनपाच्या प्रभाग समिती ब येथील कार्यालयातून हे नामनिर्देशन पत्र खरेदीसाठी इच्छुकांची गर्दी झाली होती. यामध्ये सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ५५० नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. इच्छुकांनी या अर्जांची खरेदी केली असली तरी पहिल्या दिवशी मात्र एकही नामनिर्देशन पत्र सादर झाले नाही.
परभणी मनपाच्या १६ प्रभागांसाठी पाच ठिकाणी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चित केले आहेत. या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह यंत्रणा सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी कार्यरत होती. प्रभाग समिती क कल्याण मंडपम, प्रभाग समिती अ नटराज रंगमंदिर यासह पंचायत समिती, महापौर कक्ष आणि बी. रघुनाथ सभागृह येथे प्रत्येक प्रभागासाठी नामनिर्देशन पत्र पूर्व तपासणी पथक निश्चित केले आहे. तेथे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अर्ज प्रक्रियेतील बाबींवर माहिती दिली जात आहे. याच ठिकाणी सर्वत्र प्रभागांचे नकाशे आणि इतर आवश्यक बाबींची माहिती दिली जात आहे. सर्व ठिकाणी पोलिस यंत्रणेचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोमवारी पहिल्या दिवशी या पाचही ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अर्ज सादर झाले नव्हते.
१९ पानांचा अर्जसंबंधित नामनिर्देशन पत्राची उपलब्धता प्रभाग समिती ब येथे केली होती. इच्छुक उमेदवारांना विविध ठिकाणी धावपळ करावी लागून यासाठी येथे अर्ज ठेवण्यात आले आहेत. १९ पानांच्या या अर्जामध्ये विविध बाबींची माहिती भरून त्यासोबत संबंधित कागदपत्रे जोडून शपथपत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्रांची यादी तसेच शपथपत्र आणि इतर माहितीचे फलक सर्व ठिकाणी लावण्यात आले आहेत. या नामनिर्देशन पत्राची खरेदी करण्यासाठी उमेदवाराला शंभर रुपये मोजावे लागत आहेत.
Web Summary : Parbhani Municipal Corporation election process begins. 550 nomination forms were sold, but no applications were filed on the first day. Election offices were ready, with information and security provided.
Web Summary : परभणी महानगरपालिका चुनाव प्रक्रिया शुरू। पहले दिन 550 नामांकन पत्र बिके, लेकिन कोई आवेदन दाखिल नहीं हुआ। चुनाव कार्यालय सूचना और सुरक्षा के साथ तैयार थे।