'गलिच्छ राजकारणासह शासनाचा निषेध'; जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करून न घेतल्याने परभणीकरांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 03:56 PM2021-08-02T15:56:57+5:302021-08-02T16:00:48+5:30

IAS Aanchal Goel : राजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी

'protest against Government with dirty politics'; Anger of Parbhanikar for not approving the Collector Aanchal Goel | 'गलिच्छ राजकारणासह शासनाचा निषेध'; जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करून न घेतल्याने परभणीकरांचा संताप

'गलिच्छ राजकारणासह शासनाचा निषेध'; जिल्हाधिकाऱ्यांना रूजू करून न घेतल्याने परभणीकरांचा संताप

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला,त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते?

परभणी : नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना रुजू करुन न घेताच परत बोलावल्याच्या प्रकरणानंतर सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत असून, सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत गलिच्छ राजकारणासह शासनाच्या धोरणाचा कडाडून निषेध नोंदविण्यात आला. ( Anger of Parbhanikar for not approving the Collector Aanchal Goel) 

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आंचल गोयल या आयएएस असलेल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. विशेष म्हणजे रुजू होण्यासाठी आंचल गोयल पाच दिवसांपूर्वीच परभणीत दाखल झाल्या. मात्र ऐन सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांना रुजू न करुन न घेता, परत बोलावण्यात आले. जिल्हाधिकारी पदाचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर परभणीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल रुजू होऊ नयेत, यासाठी राजकारण्यांनी कुटील डाव रचला, त्यांनी पदभार घेतला असता तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? कोणाला त्यांची अडचण होती? एक महिला अधिकारी ८ महिन्यांचे लेकरु घेऊन पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षांचे नेते मंडळी साटेलोटे करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी डावपेच रचतात, ही गोष्ट परभणीकरांनी आंदोलनातून व्यक्त केला संताप.

लांच्छनास्पद आहे, त्याचा निषेध नोंदविण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांचा हाच संताप सोमवारी जागरुक नागरिक आघाडीच्या निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माधुरी क्षीरसागर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, सुभाष जावळे, सुभाष बाकळे, माणिक कदम, संतोष आसेगावकर, राजन क्षीरसागर, गणपत भिसे, नितीन देशमुख, प्रसाद देवके, दिनेश नरवाडकर, संजय शेळके, श्रीकांत हराळे, डॉ.धर्मराज चव्हाण, अच्युत रसाळ, दत्तराव पवार, सुभाष पांचाळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

अस्वस्थ नेत्यांचे प्रयत्न यशस्वी; परभणीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच नियुक्ती रद्द

आंदोलनातून केलेल्या मागण्या
राजकीय दबावापोटी महिला आय.ए.एस. अधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून रोखले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, आंचल गोयल यांना सन्मानाने पदभार द्यावा, बेकादेशीर कृत्यासाठी प्रशासनात ढवळाढवळ करणाऱ्यांना दूर करा, भ्रष्ट व जनतेप्रती उत्तरदायित्व नसणाऱ्या प्रशासनातील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
 

Web Title: 'protest against Government with dirty politics'; Anger of Parbhanikar for not approving the Collector Aanchal Goel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.