शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

परभणी जिल्ह्यात खरिपासाठी पाच लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:39 IST

२०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे.

- मारोती जुंबडे

परभणी :  २०१८-१९ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये कापसासाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन या पिकासाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. पावसाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये सरासरी राखल्यास प्रस्तावित क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यासाठी ५ लाख २१ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यामध्ये कापसासाठी १ लाख ९१ हजार ७०० तर सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची पेरणी केली. परंतु, जून व जुलै या दोन महिन्यामध्ये पावसाने खंड दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या हातून गेली. 

कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे कापूस पीक चांगलेच बहरले. या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने कापसावर हल्ला चढविला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. एकंदरित गतवर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाडून गेला. 

यावर्षी कृषी विभागाच्या वतीने एप्रिल महिन्यात २०१८-१९ या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये कापूस लागवडीसाठी १ लाख ६५ हजार तर सोयाबीन पेरणीसाठी २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.कडधान्यासाठी ९०९१, अन्नधान्यासाठी १२५१, तिळासाठी १० हेक्टर, सूर्यफुलासाठी २ हेक्टर, कºहाळासाठी २०० हेक्टर, गळीत धान्यासाठी २ हजार ३१६ हेक्टर, ऊस पीकासाठी २ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये जूनपासून समाधानकारक पाऊस झाल्यास कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर पेरणी होण्याची अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.

२६ हजारांनी घटले कापसाचे क्षेत्रगतवर्षी कृषी विभागाने कापसासाठी १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यावर १०० टक्के कापसाची लागवडही झाली होती. परंतु, बोंडअळीच्या संकटामुळे कापूस उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी कापसाचे क्षेत्र घटणार असल्याची कल्पना कृषी विभागाला होती. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत कृषी विभागाने २६ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे कमी करुन १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी प्रस्तावित केले. 

दीड लाख मेट्रिक टन खताची मागणी यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना रासायनिक औषधे, खते यांची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेही खताचे नियोजन केले आहे. २०१८-१९ या खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार १९० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. यामध्ये ६५ हजार मेट्रिक टन युरिया, २१ हजार ६९० मे.टन, डीएपी ४ हजार  मे.टन,  एमओपी ५२ हजार ४५० मे.टन या खतांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी ८९ हजार ३६० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत ३५ हजार १७९ मे.टन खत शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रparabhaniपरभणी