शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल

By ज्ञानेश्वर भाले | Updated: August 7, 2023 16:51 IST

मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारादम्यान मृत्यू; सेलू ठाण्यात सरपंचासह पाच जणांवर गुन्हे दाखल

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि.परभणी) : उपसरपंचपदाचा राजीनामा दे या कारणांवरून सरपंचासह इतर जणांनी उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्राम्हणगावात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारदम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. निखील रमेश कांबळे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गावात पोलीस फौजफाटा तैनात असल्याने तणावपूर्ण शांतता आहे.

ब्राम्हणगावात ५ ऑगस्टला झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या उपसरपंच शशीकलाबाई रमेश कांबळे यांनी परभणी रूग्णालयात उपचारदम्यान दिलेला जाबाब सेलू ठाण्यात रविवारी रात्री उशीरा मिळाला. या फिर्यादीत आरोपी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व.रा.ब्राम्हणगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे उपसंरपचपदाचा राजीनामा दे या कारणावरून शिवीगाळ करून फिर्यादीसह तिचा पती व मुलास लाथाबुक्याने मारहाण केली होती. 

फिर्यादीचा मोठा मुलगा निखील रमेश कांबळे यास रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने त्याचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरूध्द सेलू ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे तपास करीत आहे. दरम्यान मयत निखील कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे ब्राम्हणगाव पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे.

वादाचे पर्यावसान हाणामारीतघटनेच्या दिवशी सकाळी नऊला उपसरपंचपदाच्या राजीनाम्यासाठी उपसरपंच कुटुंबातील सदस्यासोबत सरपंचासह कुटुंबातील सदस्यांनी वाद घातला होता. पुढे या वादाचे पर्यावसान त्याच दिवशी शनिवारी सायंकाळी सहाला मारहाणीत झाले. यातून उपचारदम्यान उपसरपंच यांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात फौजफाटा या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता उपविभागीय अधिकारी अधिकारी सुनिल ओव्हळ ,पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. दरम्यान रविवारी रात्री दोनला पोलीस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी दुपारी बाराला मयत निखील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीsarpanchसरपंच