शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पोलिसांच्या शोध मोहिमेत एक पिस्तूल, तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:51 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी आॅलआऊट आॅपरेशन सुरू केले आहे

परभणी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणीपोलिसांनी आॅलआऊट आॅपरेशन सुरू केले असून, या अंतर्गत परभणी शहरातून हद्दपार केलेल्या एका आरोपीच्या घरात एक पिस्तूल, दोन जीवंत काडतूस आणि एक तलवार पोलिसांनी जप्त केली आहे़ रविवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ 

पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव, मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यात १६ व १७ सप्टेंबर रोजी आॅलआऊट आॅपरेशन राबविण्यात आले़ १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मोहिमेला सुरुवात झाली़ या अंतर्गत परभणी शहरातील गुन्हेगार, गुन्हेगारी वस्ती, फरारी आरोपी, प्रतिबंधित कारवाई केलेले आरोपी तडीपार केलेले आरोपी अशा ३७ आरोपींची तपासणी करणयत आली़ रात्री ११़४० वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार केलेला आरोपी बिबनसिंग बावरी (रा़ न्यू़ नेहरू नगर, जुना पेडगाव रोड, परभणी) हा परभणी येथे आला असून, त्याच्या जवळ पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्या आधारे बिबनसिंग बावरी याच्या राहत्या घरी रात्री १२़३० वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ घराची झडती घेतली असता, पलंगावरील गादीखाली अग्नीशस्त्र गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतूस व धारदार तलवार मिळून आली़

या प्रकरणी उपनिरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ आरोपीने ही शस्त्रे कोठून आणली व त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता? याचा तपास पोलीस करीत आहेत़ ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक निरीक्षक बी़पी़ चोरमले, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, कापुरे, विवेक सोनवणे, डोंगरे, बालासाहेब तुपसुंदरे, चट्टे, भोसले, कुरवारे, हिंगोले आदींनी केली़  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीPoliceपोलिसraidधाड