आधुनिकेतेच्या जमान्यात फोटोग्राफी, व्हिडिओ शुटिंगमध्येही मोठे बदल झाले असून, लग्न समारंभ आणि वाढदिवसांच्या कार्यक्रमांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने शुटिंग, फोटोग्राफी केली जाते. सर्वसाधारणपणे ५० फुटांपर्यंत ड्रोन उडविण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. परंतु, त्यासाठी वापरलेला ड्रोनही २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा असणे आवश्यक आहे. त्यामुळे या नियमावलींचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे !
सर्वसाधारणपणे ० ते २५० ग्रॅम वजनापर्यंतच्या ड्रोनसाठी लायन्सची आवश्यकता नाही.
त्यापुढील वजनाच्या ड्रोनला मात्र संबंधितांकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो.
अधिक वजनाचे ड्रोन असतील तर उड्डयन मंत्रालयातूनही परवानगी घ्यावी लागते.
ड्रोन
वापरण्याचेही
नियम
० ते २५० ग्रॅम वजन असलेले ड्रोन ५० फुटापर्यंत उडवायचे असल्यास कोणत्याही विभागाची परवानगी घेण्याची गरज नाही.
२५० ग्रॅम ते २ किलो वजन असलेले ड्रोन २०० फुटापर्यंत उडवायचे असल्यास स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक आहे.
२०० फुटापेक्षा अधिक उंचीपर्यंत ड्रोन उडवायचा असेल तर उड्डयन मंत्रालयाची परवानगी लागते.
छोट्या कार्यक्रमांमध्ये ड्रोन उडविण्यासाठी कोणतीही परवानगी गरजेची नसली तरी काळजी घेणे आवश्यक आहे.
बाजारात नॅनो, मायक्रो ड्रोनसह २ ते २५ किलो वजनाचे लहान ड्रोन, २५ ते १५० किलो वजनाचे मध्यम आणि १५० किलोपेक्षा अधिक वजनाचे मोठे ड्राेन उपलब्ध आहेत.
परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ड्रोनचा वापर होतो. मात्र ड्रोनच्या अनुषंगाने नियमांची माहिती नसल्याने उल्लंघनही होऊ शकते.