शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:13 IST

पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयामुळे गोदाकाठचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे़ मात्र अनेक शेतकºयांच्या जमिनी बॅक वाटरखाली गेल्याने शेतकरी भूमिहिन झाले आहेत़ बॅक वॉटरखाली जाणाºया जमिनीचे मोजमाप करताना पथकाने अनेक शेतकºयांचे नुकसान केले आहे़ मावेजा वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़फरकंडा शिवारात सर्व्हे नं़ १४४ मध्ये १ हेक्टर ३१ आर जमीन आहे़ यापैकी जवळपास ८९ आर जमीन बॅक वॉटरखाली जात आहे़ या जमिनीचा मोबदला देताना केवळ ३२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे़ त्यामुळे चार शेतकºयांचे प्रत्येकी ८ आरच जमिनीचे पैसे मिळाले आहेत़ परिणामी इतर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ जायमोक्यावर येऊन पाहणी करून नव्याने सर्व्हेक्षण करावे व तातडीने लाभार्थी शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रसाद पौळ, भगवान पौळ, विठ्ठल पौळ, प्रल्हाद पौळ आदींनी विष्णू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे़दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावेजा वाटपाचे प्रकरण विष्णूपुरी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रेंगाळत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जमिनी जाऊनही शेतकºयांना मावेजासाठी संघर्ष करावा लागत आहे़प्रकल्प यंत्रणेचे दुर्लक्ष : सूड उगावत असल्याची शेतकºयांची तक्रारडिग्रस बंधाºयाचे कामकाज पाहणारे कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे़ शेतकºयांवरील अन्याय दूर करावा, यासाठी वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत़ मात्र जाणीवपूर्वक शेतकºयांना दुर्लक्षित केले जात आहे़ पाणी सोडताना शेतकरी दरवर्षी विरोध करतात़ याचाच राग मनात धरून अधिकारी व कर्मचारी सूड उगावत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत़शेतकरी राहिले वंचितपालम तालुक्यातील आरखेड शिवारात गोदावरी व गळाटी नदीच्या काठच्या जमिनी बॅक वॉटरखाली जात आहेत़ पथकाने जमिनीची मोजणी करताना अनेक शेतकºयांना वंचित ठेवले आहे़ तर काही बोगस नावांचा चिरीमिरी घेऊन यादीत सामवेश केला आहे़ तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही़ त्यामुळे मावेजा वाटपापासून बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी