परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:10 AM2019-07-15T00:10:17+5:302019-07-15T00:10:42+5:30

पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Parbhani: The wind damaged the tree near the stone | परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड

परभणी : पाथरीजवळ वाऱ्याने कोसळले झाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
पाथरी ते सेलू रस्त्यावरील देवनांद्रा गावाजवळ शनिवारी मध्यरात्री सुबाभळीचे एक झाड कोसळले. रस्त्याच्या ऐन मधोमध झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
झाडाचा अर्धा भाग काही दिवसांपूर्वीच खराब झाला होता. शनिवारी हलक्याशा हवेने हे झाड कोसळले. दरम्यान, जिल्ह्यात मोठी झाडे तुटून पडण्याची ही तिसरी घटना आहे.

Web Title: Parbhani: The wind damaged the tree near the stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.