शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

परभणीत होणार नवीन पादचारी पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:43 AM

शहरातील रेल्वेस्थानकावर १० फूट रुंदीचा नवीन पादचारी पूल मंजूर झाला असून, या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी येथे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रेल्वेस्थानकावर १० फूट रुंदीचा नवीन पादचारी पूल मंजूर झाला असून, या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी येथे दिली.दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी शनिवारी परभणी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने त्यांचे परभणी स्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांनी संपूर्ण रेल्वेस्थानकात फिरुन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचनाही केल्या. पाहणी केल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी, पत्रकारांशी चर्चा करीत असताना येथील रेल्वेस्थानकावर नवीन मोठ्या रुंदीचा दादरा मंजूर झाला असल्याची माहिती दिली. याच वेळी प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परभणी स्थानकावरील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यात स्थानकावरील पादचारी पूल अरुंद झाला असून, या पुलास जागोजागी तडे गेले असल्याची माहिती दिली. त्यावर मल्ल्या यांनी प्रत्यक्ष पादचारी पुलाची पाहणीही केली. परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेला दादरा अरुंद असून, या दादºयाचा वापर करताना एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच हा पादचारी पूल जुना झाला असल्याचे सांगितले. त्यावरुन मल्ल्या यांनी प्रत्यक्ष या पुलाच पाहणी केली. परभणी येथे नवीन १० फूट रुंदीचा दादरा मंजूर झाला असून, या दादºयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जुन्या दादºयाच्या बाजूलाच हा नवीन दादरा होणार असून, नव्याने दादरा तयार झाल्यानंतर जुना दादरा पाडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परभणी स्थानकावरील प्रिमियम पार्र्कींग, एक्स्लेटर, लिफ्टची चुकीची जागा यासह इतर अनेक प्रश्न महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांच्यासमोर मांडण्यात आले.परभणी -औरंगाबाद डेमो रेल्वे सुरु करा४यावेळी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे महाप्रबंधक मल्ल्या यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.४धर्माबाद-औरंगाबाद मार्गावर धावणाºया मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वेला प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पाच कोचेस वाढवावेत किंवा या मार्गावर नांदेड ते औरंगाबाद डेमो रेल्वे सुरु करावी, नांदेड- मुंबई, अकोला -मुंबई (मार्गे पूर्णा), औरंगाबाद- नागपूर या नवीन रेल्वे सुरू कराव्यात, नांदेड- पनवेल, अमरावती- पुणे, नागपूर- कोल्हापूर या साप्ताहिक रेल्वे गाड्यांना नियमित करावे आदी मागण्या केल्या. यावेळी अरुण मेघराज, सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, रितेश जैन, प्रवीण थानवी, डॉ.राजगोपाल कलानी, श्रीकांत गडप्पा आदींची उपस्थिती होती. दमरे उपभोक्ता समितीचे सदस्य अब्दुल बारी अब्दुल रशीद यांनीही विविध मागण्यांचे निवेदन महाप्रबंधकांना दिले.संघर्ष समितीचे निवेदन४पूर्णा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांना निवेदन देण्यात आले. मराठवाडा क्रांती सुपरफास्ट रेल्वेला पूर्णा येथे थांबा द्यावा, लातूररोड-नांदेड या मार्गाऐवजी लोहा- नांदेड- पूर्णा असा रेल्वेमार्ग करावा, क्रु बुकींग लॉबीच्या कर्मचाºयांचे स्थलांतर बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या.सहा महिन्यांत रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणपूर्णा- मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती द.म.रेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी दिली. शनिवारी मल्ल्या यांनी पूर्णा स्थानकावरील विविध कामांची पाहणी केली. यावेळी अ‍ॅड.अब्दुल सय्यद, ओंकारसिंह ठाकूर, डॉ.गुलाब इंगोले, राजेंद्र कमळू, डॉ.अजय ठाकूर, सुधाकर खराटे, हुजूर अहमद, विष्णू कमळू यांनी मल्ल्या यांच्याशी संवाद साधला. भविष्यात पूर्णा शहराला न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पत्रकारांशी बोलताना मल्ल्या म्हणाले, मुदखेड ते परभणी दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु असून हा मार्ग पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. स्थानकावर सुरक्षा बलांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणाही सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक प्रबंधक नीलकंठ रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे