शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राजकीय स्वार्थासाठी पळविले पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:20 IST

तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी ) : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा हा नांदेडच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा प्रत्यय वारंवार शेतकºयांना येत आहे. या बंधाºयासाठी स्थानिक शेतकºयांची शेती पाण्याखाली गेली आहे. पाणी मात्र नांदेडसाठी सोडले जात आहे. २२ डिसेंबर रोजी चार तासात २० दलघमी पाणी देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडसाठी ६८ टक्के तर पालम तालुक्यासाठी ३२ टक्के तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील निष्क्रिय पुढाºयांमुळे या आरक्षणात अजूनही बदल झालेला नाही. विष्णुपुरी बंधाºयात मुबलक पाणीसाठा असातनाही डिग्रसचे पाणी घेण्यात आल्याने स्थानिक शेतकºयांत संतापाची लाट उसळली आहे. पाणी नेल्यानंतर नांदेड शहरातील दोन आमदारांतील राजकारण रंगात आले आहे. शेतकºयांना पाणी देण्यासाठी डिग्रसच्या पाण्याचा वापर केला जात आहे, हेच यावरून दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी या नावाखाली नांदेड जिल्ह्यातील शेती सुजलामसुफलाम केली जात असून पालम, पूर्णा तालुक्यातील शेतकºयांची राखरांगोळी केली जात आहे. प्रत्येक वेळी पाणी देताना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्थानिक जनतेला विश्वासात घेत असतात. यावेळी मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. हक्काचे पाणी असूनही रातोरात जिल्हा प्रशसनाच्या मदतीने नांदेडच्या पुढाºयांनी पाणी पळविले आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक जनतेची माती करीत नांदेडला सढळ हाताने पाणी सोडून दिले आहे. यामुळे शासनाच्या कारभारावर शेतकरीवर्ग व स्थानिक जनता नाराज आहे. डिग्रस बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.आरक्षण डावलून दिले पाणीपालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ६८ टक्के पाणी नांदेडसाठी आणि ३२ टक्के पाणी पालम तालुक्यासाठी राखीव ठेवले आहे. बंधाºयात केवळ २६ दलघमी पाणी असताना २० दलघमी पाणी नांदेड जिल्ह्यासाठी सोडण्यात आले. सोडलेले पाणी आरक्षणाच्या कोणत्या नियमानुसार सोडले, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. २६ दलघमीतून केवळ ६८ टक्के पाणी नांदेड जिल्ह्याला देणे आवश्यक होते. परंतु पालम तालुक्यासाठी आरक्षित केलेले पाणीही नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे पालम तालुक्यालावर एका अर्थाने अन्यायच करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई