शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परभणी : नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:40 AM

जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़महिला व बालकल्याण सभापतीपदी नलिनी चिमणगुंडेसोनपेठ- नगरपालिकेच्या विषय समित्या गठीत झाल्या असून, महिला व बालकल्याण सभापतीपदी नलिनी विनोद चिमणगुंडे, उपसभापतीपदी सैदाबी जहीर राज यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा जिजाबाई चंद्रकांत राठोड यांची निवड झाली आहे़सोनपेठ नगरपालिकेच्या विषय समित्या गठीत करण्यासाठी २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार जीवराज डापकर हे होते़ विषय समितीच्या निवडीत सदस्यपदी आशाबाई घुगे, शेख मेराजबी युनूस, सुवर्णा सुनील बर्वे यांची निवड करण्यात आली़ त्याचबरोबर स्थायी समितीच्या सदस्यपदी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, पदसिद्ध सदस्य नलिनी चिमणगुंडे, रमाकांत राठोड, अ‍ॅड़ श्रीकांत भोसले यांच्या निवडी करण्यात आली़ या विशेष सभेला १९ सदस्य उपस्थित होते़ सहायक पीठासीन अधिकारी म्हणून पाथरी ऩप़चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, कार्यालयीन अधीक्षक विश्वंभर सोनखेडकर, छगन मिसाळ यांनी काम पाहिले़सेलूत स्थायी व विषय समित्या बिनविरोधसेलू-नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली़ या निवडीसाठी ऩप़च्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले़महिला व बालकल्याण सभापतीपदी शेख अख्तर बेगम म़ अय्युब तर बांधकाम सभापती म्हणून शेख रहीम यांची बिनविरोध निवड झाली़ त्याचबरोबर पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी शेख कासीम तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यसमितीच्या सभापतीपदी विठ्ठल काळबांडे यांची बिनविरोध निवड झाली़ स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे व विषय समितीचे सर्व सदस्य त्याचबरोबर वहीद अन्सारी, गौतम धापसे, हेमंतराव आडळकर यांचा सदस्य म्हणून निवड झाली़ यावेळी मुख्याधिकारी देविदास जाधव यांची उपस्थिती होती़चिठ्ठी काढून सभापतीची निवडगंगाखेड- गंगाखेड नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ पाणीपुरवठा समिती सभापतीपदासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून सभापतीपदाची निवड करण्यात आली़सार्वजनिक बांधकाम समिती सभापदीपदी अजीज खान इब्राहीम खान पठाण, स्वच्छता, वैद्यकीय शेख इस्माईल, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी विमलबाई घोबाळे, शिक्षण समिती सभापतीपदी सत्यपाल साळवे, स्थायी समिती सदस्यपदी शैलाबाई ओझा, नागनाथ कासले, अ‍ॅड़ सय्यद अकबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सीमाताई राखे व अपक्ष नगरसेविका तलत शेख मुस्तफा या दोघांनाही समान ३-३ मते मिळाल्याने दोघांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली़ यात सीमाताई राखे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली़ यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून विश्वंभर गावंडे, सीईओ नानासाहेब कामठे आदी उपस्थित होते़बांधकाम सभापतीपदी श्यामराव मते४जिंतूर- नगरपालिकेच्या विविध सभापतीपदी पदाच्या व स्थायी समितीच्या निवडीसाठी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष बैठक बोलावण्यात आली़ या बैठकीत बांधकाम सभापतीपदी श्यामराव मते यांची बिनविरोध निवड करण्यात आली़४पाणीपुरवठा सभापतीपदी आशाताई अंभोरे यांची निवड करण्यात आली़ महिला व बालकल्याण सभापतीपदी शेख फरजाना बेगम अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ स्थायी समितीची निवडणूकही बिनविरोध पार पडली़ तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या़४यावेळी नगराध्यक्षा साबिया बेगम फारुखी, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, ऩप़ सदस्य कपिल फारुखी, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, दत्ता काळे, दलमीर पठाण, शोएब जानीमिया, फेरोज कुरेशी, उस्मान पठाण, रामराव उबाळे, शेख इस्माईल, अहमद बागवान आदींची उपस्थिती होती़पाथरी नगरपालिकेतही बिनविरोध निवडीपाथरी- नगरपालिकेची विषय समिती स्थापन करण्यासाठी २१ जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली़ पालिकेच्या सभागृहात दुपारी १ वाजता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व्ही़एल़ कोळी, सहायक अधिकारी तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली़ सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी हासेब खान तैजीब खान यांची तर स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी शेख इरफान शेख उस्मान, महिला व बालकल्याण सभापतीपदी गुफा किरण भाले पाटील यांची तर पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी हन्नानखान दुर्राणी यांची निवड करण्यात आली़ यावेळी गटनेता जुनेद खान दुर्राणी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़बांधकाम सभापतीपदी उत्तम खंदारेपूर्णा- पालिकेच्या स्थायी समिती व विषय समितीच्या २१ जानेवारी रोजी निवडी करण्यात आल्या़ यामध्ये बांधकाम सभापतीपदी उत्तम खंदारे यांची निवड करण्यात आली़ पूर्णा पालिका सभागृहात तहसीलदार श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेत पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी शेख मन्नाबी शेख बशीर, शिक्षण सभापतीपदी विशाल कदम, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी लता खराटे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कुरेश महेमुदा बेगम महेबूब यांची तर स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांची निवड करण्यात आली़ यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नंदू चावरे, शंकर काळे, मोहन एंगडे, सय्यद इम्रान यांची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक