परभणी शहरातील त्रिमुर्ती नगरामधील अनिल शिवकुमार पातुरकर यांनी त्यांची दुचाकी (एमएच २२ डब्यू ५८२२) रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोर उभी केली होती. त्यानंतर ते दुसरी दुचाकी घेऊन बाजारात खरेदीसाठी गेले. रात्री नऊ वाजता ते परत आले असता घरासमोर दुचाकी दिसून आली नाही. याबाबत त्यांनी १२ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव ते गोगलगाव दरम्यान एक पेट्रोल पंपावर घडली. परळी तालुक्यातील रंगानाथ डिगांबर चांगिरे यांनी त्यांची दुचाकी (एमएच ४४ एक्स ४०६७) इस्माईल शेख या व्यक्तीला दिली होती. ४ सप्टेंबरला रात्री इस्माईल शेख हे वालूरकडे जात असताना ढेंगळी पिंपळगाव ते गोगलगाव दरम्यान त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी दुचाकी एका पेट्रोल पंपावर उभी केली असता ती चोरीस गेल्याचे काही वेळांनी समोर आले. याबाबत रंगनाथ चांगिरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात याबाबत १२ सप्टेंबरला फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी, सेलूतून दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST